Sharad Pawar
Sharad Pawar Sarkarnama
देश

पुन्हा काॅंग्रेसमध्ये येणार का, या प्रश्नावर शरद पवारांनी पत्रकाराला झापले...

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : ऱाष्ट्रवादी काॅंग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांची काल दिल्लीत भेट घेतल्यानंतर राज्यात विविध राजकीय चर्चा सुरू झाल्या आहेत. शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत यांच्यावरील कारवाईसंदर्भात शरद पवारांनी घेतली पंतप्रधानांची भेट घेतल्याचे सांगण्यात आले. यानिमित्त झालेल्या पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने नको तो प्रश्न विचारला.

पवार यांनी भेटीचे सविस्तर कारण सांगितल्यानंतर युपीएचे अध्यक्षपद (संयुक्त पुरोगामी आघाडी, UPA) स्वीकारणार का, या विषयावरचा प्रश्न विचारण्यात आला. युपीए अध्यक्ष पद आम्ही मागितलेले नाही. हे पद घ्यायला मी तयार नाही हे कितीतरी वेळा सांगितले आहे असेही शरद पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितले. त्यानंतर एका पत्रकाराने तुम्ही काॅंग्रेसमध्ये परतणार का, असा सवाल केला. या प्रश्नाने पवार चिडले आणि असे प्रश्न का विचारता, असा सवाल त्यांनी केला. या प्रश्नाचा काही संबंध आहे का, असे चिडून सांगितले.

केंद्रीय यंत्रणा करत असलेल्या कारवाईमुळे महाविकास आघाडी सरकारला कोणताही धोका नाही. सरकार चांगले चालले आहे. पुढील अडीच वर्षांने निवडणुका होतील तेव्हाही हेच सरकार येईल असा स्पष्ट विश्वास त्यांनी यानिमित्ताने व्यक्त केला. पंतप्रधानांसोबतच्या भेटीत राज्यातील राज्यपाल नियुक्त विधानपरिषदेच्या प्रलंबित १२ आमदारांचा विषय आणि खासदार संजय राऊत यांच्यावर केंद्रीय यंत्रणेने केलेल्या कारवाईचा मुद्दा पंतप्रधानांच्या कानावर घातल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले.

कोण काय बोलतो हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे आणि कुणाच्या बोलण्यावरून भाजपसोबत जाण्याचा प्रश्नच नाही. राज्यातील तिन्ही पक्षाने केंद्रीय यंत्रणांच्या विरोधात पाऊले उचलली आहेत आणि उचलत राहणार आहोत असेही शरद पवार यांनी स्पष्ट सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT