`भाजप नेत्यासोबत मी 27 वर्षे `लिव्ह इन`मध्ये... आमच्या मुलाला त्याने बापाचे नाव द्यावे`

नवी मुंबईतील (Navi Mumbai) एका वजनदार भाजप नेत्यावर महिलेच्या आरोपाने खळबळ
Navi Mumbai BJP leader
Navi Mumbai BJP leader Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : नवी मुंबईतील (Navi Mumbai) भारतीय जनता पक्षाचा (BJP) वजनदार नेता गोत्यात येण्याची शक्यता आहे. एका महिलेने या नेत्याविरोधात फसवणुकीची तक्रारी दिली आहे. 'माझ्यासोबत २७ वर्षापूर्वी या नेत्याने लग्न केले असून, आम्हा दोघांना एक मुलगा आहे. मात्र, हे आता तो मान्य करीत नाही,`असे या महिलेने तक्रार अर्जात म्हटले आहे. या प्रकरणात महिलेला न्याय देण्याच्या उद्देशाने ठाकरे सरकारने हालचाली सुरू केल्याचे सांगण्यात येत आहे. यानिमित्ताने भाजपला धक्का देण्याची चालही खेळली जाऊ शकते.

Navi Mumbai BJP leader
सदावर्ते आणि एसटी कर्मचाऱ्यांच्या हाती काहीच लागलं नाही!

या प्रकरणात या नेत्याविरोधात नेरुळ पोलिस ठाण्यात ४७ वर्षांच्या महिलेने तक्रार दिली आहे. गंभीर म्हणजे, थेट पोलिस ठाणे गाठून पोलिसांपुढे तक्रारींचा पाढा वाचला. अद्याप गुन्हा दाखल झाला नसल्याने संतप्त झालेल्या महिले प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींशी संवाद साधून डझनभर आरोप केले. या घटनेने मुंबई आणि नवी मुंबईच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. दरम्यान, या प्रकरणाची दिवसभर चर्चा सुरू असतानाही संबंधित नेत्याकडून अद्याप खुलासा करण्यात आलेला नाही.

Navi Mumbai BJP leader
सदावर्ते जो आदेश देतील त्यानुसार...! एसटी कर्मचाऱ्यांचा जल्लोष पण संप मिटणार का?

आपल्या तक्रारीची दखल घेतली नसल्याचे सांगून ही महिला ठाकरे सरकारमधील काही मंत्र्यांची भेट घेऊन, भूमिका मांडणार असल्याचेही बोलले जात आहे. या प्रकरणावरून नव्याने राजकारण होण्याची शक्यता आहे. त्यातून ठाकरे सरकार विरोधक हे आमनेसामने येण्याची चिन्हे आहेत.

'आम्ही गेल्या २७ वर्षांपासून 'लिव्ह इन रिलेशनशिप' मध्ये राहात आहोत. याच काळात आम्हाला एक मुलगा झाला आहेत. या मुलाला त्या नेत्याने हक्क देणे अपेक्षित आहे. मात्र, त्यासाठी ते टाळाटाळ करीत आहेत आणि आमच्यातील नात्याची वस्तुस्थिती मान्य करीत नाहीत. त्यामुळे मी पोलिसांकडे तक्रार केली आहे. त्यानुसार मला न्याय मिळावा, अशी अपेक्षाही या महिलेने तक्रार अर्जातून मांडली आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com