Sharad Pawar, Ajit Pawar Sarkarnama
देश

Sharad Pawar News : अजितदादांच्या नाराजीवर शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले, "एक टक्काही... "

सरकारनामा ब्यूरो

Sharad Pawar on Ajit Pawar : राष्ट्रवादी काँग्रेसचा आज शनिवारी (ता. १० जून) वर्धापन दिनाचा दिल्लीत कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी कार्यकारी अध्यक्ष म्हणून ज्येष्ठ नेते प्रफुल पटेल आणि सुप्रिया सुळे यांची निवड केली. तसेच इतर नेत्यांना विविध जाबादाऱ्या दिल्या. यावेळी विरोधी पक्षनेते अजित पवार यांना कुठलीही जबाबदारी मिळाली नाही. तसेच या सभेनंतर अजित पवार तातडीने मुंबईला रवाना झाले. त्यामुळे अजित पवारांबाबत नाराजीच्या चर्चांना पुन्हा उधाण आले. (Latest Marathi News)

अजित पवार यांच्याकडे आता कुठलीही जाबाबदारी दिली नाही, याबाबत शरद पवार यांनी कारणे सांगितली. यासह त्यांच्या नाराजीबाबतही पवारांनी स्पष्टपणे मत व्यक्त केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षांच्या निवडीनंतर शरद पवार (Sharad Pawar) यांनी दिल्लीतील निवासस्थानी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी आज केलेल्या निवडीबाबत चर्चा केली. तसेच लोकसभा निवडणुसाठी विरोधकांच्या रणनितीबाबतही माहिती दिली.

शरद पवार म्हणाले, "गेल्या काही दिवसांपासून पक्षातील ज्येष्ठ नेते जयंत पाटील (Jayant Patil) आणि अजित पवार हे नाराज असल्याचा चर्चा होतात. आताही त्या चर्चांना उधाण आले आहे. मात्र तसे काही नाही. जयंत पाटील यांच्याकडे महाराष्ट्राचे अध्यक्षपद आहे. ही जाबाबदारी ते सक्षमपणे पार पाडत आहेत. तसेच अजित पवार हे राज्याचे विरोधी पक्षनेते आहेत. ही खूप महत्वाची जाबाबदारी अजित पवार (Ajit Pawar) सक्षमपणे पेलत आहेत. अधीच महत्वाची जबाबदारी असल्याने त्यांना आता कुठलीही जबाबदारी दिली नाही. अजित पवार नाराज आहेत यात एक टक्काही तथ्य नाही."

सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि पटेलांना कार्यकारी अध्यक्षपदाची जबाबदारी देण्याचेही कारण पवार यांनी सांगितले. शरद पवार म्हणाले, "राज्यसभेचे खासदार प्रफुल पटेल (Praful Patel)आणि लोकसभेच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्याकडे आता विशेष अशी जबाबदारी नव्हती. त्यामुळे या दोघांकडे पक्षाचे कार्यकारी अध्यक्षपद सोपवले आहे. ते या पदाला न्याय देतील यात काही शंका नाही."

यावेळी पवारांनी भाजपवर (BJP) टीका केली. ते म्हणाले, "भाजप देशात ठिकठिकाणी धार्मिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करीत आहेत. कर्नाटकमध्येही हनुमानाचा मुद्दा काढून वाद करण्याचा त्यांचा प्रयत्न होता. मात्र त्यांना कर्नाटक जनतेने नाकारले. महाराष्ट्रातही सध्या तेच केले जात आहे. मात्र महाराष्ट्राचीही जनता त्यांना थारा देणार नाही. सध्या विरोधक एकत्र येत आहेत. भाजपची ताकद आहे त्या ठिकाणी सर्व विरोधक एकत्र येऊन लढा देतील."

(Edited by Sunil Dhumal)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT