Sharad Pawar News:
Sharad Pawar News: Sarkarnama

NCP Working President: दोन कार्यकारी अध्यक्ष का करण्यात आले?; पवारांनी सांगितलं कारण...

Sharad Pawar News: शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत नव्या जबाबदाऱ्या का देण्यात आल्या? याची माहिती दिली.
Published on

Political News: राष्ट्रवादी काँग्रेसच्या वर्धापनदिनानिमित्त दिल्लीत आयोजित कार्यक्रमात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठी घोषणा केली. खासदार सुप्रिया सुळे आणि ज्येष्ठ नेते प्रफुल्ल पटेल यांची राष्ट्रवादी काँग्रेसचे नवे कार्यकारी अध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. या निवडीनंतर आता शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेत नव्या जबाबदाऱ्या का देण्यात आल्या? याची माहिती त्यांनी दिली.

पवार म्हणाले, "राज्याच्या बाहेर पक्षाचे संघटन मजबूत करण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. त्यामुळे पक्षातील सहकाऱ्यांना काही नव्या जबाबदाऱ्या देण्याचा निर्णय घेतला आहे. पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी हा महत्वाचा निर्णय असून चर्चेतून सहकाऱ्यांना ही जबाबदारी देण्याचा निर्णय घेण्यात आला", असं पवारांनी सांगितलं.

Sharad Pawar News:
NCP Working President: दोन कार्यकारी अध्यक्ष का करण्यात आले?; पवारांनी सांगितलं कारण...

"आगामी निवडणुकांना एक वर्ष शिल्लक आहे. आम्ही सर्वजण एकाच ठिकाणी पोहचू शकत नाही. त्यामुळे दोन कार्यकारी अध्यक्ष करण्यात आले आहे. तर लोक आग्रस्तव सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष करण्यात आलं असून इतर सहकाऱ्यांवर देखील मोठी जबाबदारी देण्याचा निर्णय आधीच केला होता", असं यावेळी त्यांनी सांगितलं.

"सुप्रिया सुळे यांच्याकडे पंजाब, हरियाणा, महाराष्ट्राबरोबरच इतर राज्यातील प्रश्न हाताळतील. तसेच त्यांच्याकडे लोकसभेत प्रश्न मांडण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. तर प्रफुल्ल पटेल यांच्याकडे गुजरात, मध्य प्रदेश आणि गोव्याची जबाबदारी सोपवण्यात आली".

"तसेच अजून काही सहकाऱ्यांवर जबाबदाऱ्या सोपवण्यात आलेल्या आहेत. आता यापुढे कुठल्या-कुठल्या राज्यात विधानसभा लढवता येतील, यासाठी आम्ही चाचपणी करणार आहोत", असंही पवार यावेळी म्हणाले.

Sharad Pawar News:
Jayant Patil on Ajit Pawar: अजित पवार यांच्यावर अन्याय झाला का?; जयंत पाटलांनी स्पष्ट सांगितलं...

"याबरोबरच येत्या 23 जूनला पटणामध्ये विरोधी पक्षांची बैठक आहे. आगामी निवडणुकीमध्ये इतर पक्षांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीबाबत बैठकीत आम्ही चर्चा करू. भाजपची ताकद जास्त असणाऱ्या ठिकाणी विरोधकांना सोबत घेण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे", असंही शरद पवारांनी यावेळी सांगितलं.

Edited By- Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com