Sharad Pawar Vs Ajit Pawar : Sarkarnama
देश

NCP Crisis News : 'अजित पवारांचा पक्ष विस्तारामध्ये कुठलाही हातभार नाही'; शरद पवार गटाच्या वकिलांचा मोठा दावा

Sharad Pawar Vs Ajit Pawar : 'एका गटाला पक्षावर ताबा हवाय, त्यासाठी कट रचला गेला', शरद पवारांच्या वकिलांचे गंभीर आरोप

Ganesh Thombare

Delhi News: राष्ट्रवादी काँग्रेसमधील पक्ष आणि चिन्हाच्या वादावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी पार पडत आहे. शुक्रवारी झालेल्या सुनावणीत शरद पवार गटाच्या वकिलांकडून जोरदार युक्तिवाद करण्यात आला. "हा पक्षाच्या अध्यक्षपदाचा वाद नसून एका गटाला पक्षावर ताबा हवा आहे, त्यासाठी हा कट रचला गेला," असा गंभीर आरोप शरद पवार गटाचे वकील देवदत्त कामत यांनी केला आहे.

देवदत्त कामत यांनी निवडणूक आयोगाला 2019 पासूनचा घटनाक्रम सांगितला. "2019 मध्ये जनतेने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या आघाडीला मतदान केले होते. त्यामुळे राष्ट्रवादीला 54 जागा आणि काँग्रेसला 44 जागा मिळाल्या. त्यानंतर महाविकास आघाडीची स्थापना करण्यात आली. मात्र, अजित पवारांचा पक्ष विस्तारामध्ये कुठलाही हातभार किंवा भूमिका राहिली नाही," असा दावा कामत यांनी केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

"अजित पवारांकडे पक्षात किंवा संघटनेत कुठलीही जबाबदारी नाही. महाविकास आघाडी सरकारमध्ये ते पक्षाचे नेते होते, पण अजित पवारांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातील सर्व सत्ता हवी आहे, म्हणून त्यांनी प्रफुल्ल पटेल यांच्याशी संपर्क साधला. दिल्लीत पार पडलेल्या आठव्या अधिवेशनाच्या दरम्यान शरद पवारांची अध्यक्ष म्हणून निवड करताना प्रस्तावक म्हणून प्रफुल्ल पटेल होते. आता मात्र पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीला ते बेकायदेशीर म्हणत आहेत,"असे कामत म्हणाले.

"पवारांच्या अध्यक्षपदाच्या निवडीवेळी सर्व प्रक्रिया ही निवडणूक अधिकारी म्हणून पितांबर मास्टर यांनी पार पाडली. 11 सप्टेंबरला शरद पवार यांची पक्ष अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय अधिवेशनात पितांबर मास्टर यांनी घोषणा केली होती. पितांबर मास्टर हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या निवडणूक कार्यक्रम समितीचे प्रमुख होते," असेही कामत यांनी स्पष्ट केले.

"शरद पवार हेच आतापर्यंत कायम राष्ट्रीय अध्यक्ष राहिलेले आहेत, त्यांनीच पक्षाचा विस्तार केला, ते निर्विवाद अध्यक्ष राहिले आहेत, त्यामुळे त्यांच्या अध्यक्षपदावर प्रश्न उपस्थित केला जाऊ शकत नाही. शरद पवार यांची भूमिका कायम पक्षाच्या हिताची आहे," असेही त्यांनी आयोगाला सांगितले.

"अजित पवार यांच्या वतीने जेव्हा दुसरा गट स्थापन करण्यात आला, तेव्हा त्यांनी थेट आपलं अध्यक्षपदासाठी नाव निश्चित केलं. यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या घटनेनुसार कुठलीही कारवाई करण्यात आली नाही. अध्यक्षपदावर त्यांनी दावा करत स्वतःला अध्यक्ष म्हणून घोषित केले, पण हे चुकीचं असून घटनेला धरून नाही. अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करताना कुठलीही निवडणूक पार पडलेली नाही. अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करताना नियम पाळले गेले नाहीत," असे कामत म्हणाले.

(Edited By - Ganesh Thombare)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT