NCP Crisis Sarkarnama
देश

NCP Crisis News : शरद पवार गटाची खेळी; 'राष्ट्रवादी कुणाची' सुनावणीत निवडणूक आयोगालाच पकडणार कोंडीत?

Chetan Zadpe

New Delhi News : राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गटाकडून निवडणूक आयोगाच्या अधिकारक्षेत्रावर प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे. निवडणूक आयोगाचं अधिकार क्षेत्र किती? असा थेट सवाल शरद पवार गटाने विचारला आहे. पक्षात कोणतीही फूट नसल्याचं सांगितलेलं असतानासुद्धा आयोगाने सुनावणीसाठी का बोलावलं? असं म्हणत शरद पवार गटाने निवडणूक आयोगावर टीका केली आहे. (Latets Marathi News)

राष्ट्रवादी कुणाची यावर ६ ऑक्टोबर रोजी निवडणूक आयोगात सुनावणी पार पडणार आहे. या सुनावणीसाठी शरद पवार गट आणि अजित पवार गट असे दोन्ही गटांनी तयारी केली आहे. परंतु निवडणूक आयोगाचे कार्यक्षेत्र काय आहे? याबाबत शरद पवार गटाने प्रतिप्रश्न केला आहे. निवडणूक आयोगासमोर होणाऱ्या सुनावणीदरम्यान शरद पवार गट प्रश्न उपस्थित करणार आहे. पक्षामध्ये कोणतीही फूट नाही, असं शरद पवार गटाकडून वारंवार सांगण्यात येत आहे, तरीही सुनावणीला का बोलावलं? असंही शरद पवार गट आयोगासमोर प्रश्न मांडून निवडणूक आयोगालाच कोंडीत पकडण्याचा प्रयत्न असणार आहे.

ठाकरे गट आयोगाविरोधात सुप्रीम कोर्टात -

निवडणूक आयोगाचं कार्यक्षेत्र किती? आपल्या अधिकारक्षेत्राच्या बाहेर जाऊन निवडणूक आयोग काम करत आहे का? असा सवाल शरद पवार गटाने उपस्थित केला आहे. निवडणूक आयोगाच्या निर्णयाविरुद्ध शिवसेना ठाकरे गट या आधीच सुप्रीम कोर्टात गेली आहे. यामुळे निवडणूक आयोगाच्या भूमिकेवर विरोधकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहेत.

सुप्रीम कोर्टाची महत्त्वपूर्ण टिपण्णी -

शिवसेना फुटीनंतर सर्वोच्च न्यायालयाने यावर सुनावणी करताना सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी पक्षावर दावा करण्याबाबत महत्त्वाची टिपण्णी केली होती . सरन्यायाधीस चंद्रचूड म्हणाले होते की, "पक्षातला कोणताही फुटीर गट आपणच पक्ष आहोत, असा दावा करू शकत नाही.' त्यामुळे आता निवडणूक आयोग याबाबत काय सुनावणी करणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

(Edited By - Chetan Zadpe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT