NCP Minister Upset : राष्ट्रवादीचे मंत्री अस्वस्थ?; उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घेतली भेट

Ajit Pawar Group News : मागील काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे.
Ajit Pawar Group
Ajit Pawar GroupSarkarnama

Mumbai News : उपमुख्यमंत्री अजित पवार गटाचे मंत्री कॅबिनेटपूर्व बैठकीसाठी भारतीय जनता पक्षाचे नेते तथा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भेटीला गेले आहेत. तत्पूर्वी उपमुख्यमंत्री अजितदादांनी आपल्या मंत्र्यांची बैठक घेतली. आता हे मंत्री फडणवीसांच्या भेटीला का गेले, अशी चर्चा रंगली आहे. ही भेट नियमित असली तरी मागील काही दिवसांपासून सत्ताधारी पक्षातही आलबेल नसल्याचे दिसून येत आहे. त्यातच पालकमंत्री आणि अधिकाराच्या वाटपावरून राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे सांगितले जात आहे. (Ministers of Ajit Pawar group meet Deputy Chief Minister Devendra Fadnavis)

उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतल्यानंतर दिलीप वळसे पाटील, छगन भुजबळ, अनिल पाटील, आदिती तटकरे, संजय बनसोडे, धनंजय मुंडे, अनिल पाटील, हसन मुश्रीफ हे मंत्री देवेंद्र फडणवीसांना भेटण्यासाठी त्यांच्या दालनात गेले आहेत. या गोष्टीची राज्यात चर्चा होताना दिसत आहे.

Ajit Pawar Group
MLA Disqualification Case : एकनाथ शिंदे- उद्धव ठाकरेंना विधिमंडळ आज नोटिसा पाठविणार...

सत्तेत सहभागी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसला मंत्रिमंडळात वजनदार अशी खाती मिळाली. त्यानंतर लगेच पालकमंत्रिपद आणि अधिकारांचे वाटप होईल, असे राष्ट्रवादीच्या नेत्यांना वाटत होते. मात्र, सरकारमध्ये सामील होऊन तीन महिने झाल्यानंतरही पालकमंत्रिपदांचे वाटप होत नसल्याने राष्ट्रवादीचे मंत्री अस्वस्थ असल्याचे सांगण्यात येत आहे. याच मुद्द्यावरून उपमुख्यमंत्री अजित पवार हेही आक्रमक झाले होते.

राष्ट्रवादीच्या वाट्याची मंत्रिपदे आणि पालकमंत्रिपदाचे वाटप व्हावे, यासाठी पवार हे दोन दिवसांपूर्वी झालेल्या बैठकीपासून आडून बसले होते, अशीही चर्चा रंगली होती. आता त्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजपकडून काय तोडगा काढण्यात येतो, हेही पाहावे लागणार आहे.

Ajit Pawar Group
Junnar Politics : सत्यशील शेरकरांकडे स्नेहभोजन करत शरद पवारांनी केली राजकीय पेरणी...

दरम्यान, अधिकारांच्या वाटपावरूनही राष्ट्रवादीच्या मंत्र्यांमध्ये अस्वस्थता असल्याचे सांगण्यात येत आहे. सरकारमध्ये सामील झाल्यानंतर सुरुवातीच्या काळात राष्ट्रवादी नेत्यांच्या शब्दाला मान दिला जात होता, मात्र आता तो तितक्याच प्रमाणात मिळतो की नाही, याचीही चर्चा आहे.

दुसरीकडे, राष्ट्रवादी काँग्रेसमधील अजित पवारांचा गट सत्तेत सामील झाल्यानंतर शिवसेनेचा शिंदे गट प्रचंड अस्वस्थ झाला होता. कारण शिंदे गट आणि भाजपला मिळणाऱ्या सत्तेत अजितदादांचा गट सहभागी झाला होता. शिंदे गटातील अनेक आमदार मंत्रिपदासाठी गुडघ्याला बाशिंग बांधून तयार होते. मात्र, तत्पूर्वीच राष्ट्रवादीचे आमदार मंत्री झाल्याने शिंदे गट प्रचंड बेचैन झाला होता. त्यातच रायगडसारख्या जिल्ह्यातील पालकमंत्रिपदावरून दोन्ही गटांत शाब्दिक चकमकी झडत आहेत, त्यामुळे आता अजित पवार गटही अधिकाराच्या विभागणीवरून, तसेच पालकमंत्रिपदाच्या वाटपावरून अस्वस्थ असल्याचे बोलले जात आहे.

Ajit Pawar Group
Manoj Jarange Solapur Tour : मनोज जरांगे 5 ऑक्टोबरपासून सोलापूर दौऱ्यावर; या पाच ठिकाणी होणार जाहीर सभा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com