Shashi Tharoor News : काँग्रेस नेते शशि थरुर यांच्या वाहनांना घेरून त्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. केरळ विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर युडीएफ उमेदवार ए. पी. अनिल कुमार यांच्या प्रचारासाठी शशी थरूर जात होते. त्यावेळी सात ते आठ जणांना ताफा अडवत हल्ल्या करत थरुर यांच्या सुरक्षा रक्षकाला मारहाण केल्याची माहिती आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, केरळमधील मलप्पुरम जिल्ह्यातील वंडूर भागात युडीएफ उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन गाड्यांच्या ताफ्यासह शशी थरुर जात होते. पुढील गाडीत ते बसले होते.तर, मागील गाडीत त्यांचे सुरक्षा कर्मचारी होते. तेव्हा दोन कारमधून आलेल्या आठ जणांना थरुर यांचा ताफा रोखला.
हल्लेखोरांना थरुर यांच्या गाडीच्या काचांवर मारले. तेव्हा मागील गाडीत असलेला थरुर यांचा सुरक्षा रक्षक बाहेर आला. त्याने मध्यस्थी करत हल्लेखोरांना रोखण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी त्याला देखील धक्काबुक्की करण्यात आली. त्यामुळे काही काळ येथे तणाव निर्माण झाला होता.
या प्रकरणी पोलिसांमध्ये तक्रार देण्यात आली आहे. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत हल्लेखोरांपैकी दोघांना अटक केली आहे. हा हल्ला पूर्व नियोजित आहे की केवळ रस्त्यावर झालेल्या किरकोळ वादाचा आहे याचा तपास पोलिस करत आहेत. दरम्यान, 9 एप्रिलला केरळ विधानसभेसाठी मतदान होणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.