MP Manickam Tagore Resigns : काँग्रेस खासदाराचा राजीनामा, ऐन निवडणुकीत नाराजीनाट्य

Congress Tamilnadu : ऐन विधानसभा निवडणुकीत काँग्रेसमधील खासदाराने उघड नाराजी व्यक्त करत त्याच्याकडे असलेल्या पदाचा राजीनामा दिली आहे.
MP Manickam Tagore Resigns
MP Manickam Tagore Resignssarkarnama
Published on
Updated on

Congress News : काँग्रेसमधील नाराजीनाट्य समोर आले आहे. पाच राज्यांमध्ये विधानसभा निवडणूक सुरू असताना तामिळनाडूनमधील विरुधुनगरचे खासदार,काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मणिकम टागोर यांनी पक्षाच्या तामिळनाडू निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

जागा वाटपावरून टागोर हे नाराजी असल्याची माहिती आहे. डीएमकेसोबत काँग्रेसची युती आहे. काँग्रेसकडे असलेल्या विद्यामान 18 आमदारांच्या जागेपैकी दोन जागा डीएमके आपल्याकडे ठेवल्याने टागोर नाराज होते.

काँग्रेसला दिलेल्या जागांपैकी सात जागा हे एडीएमकेच्या बालेकिल्ला समजल्या जाणाऱ्या मतदारसंघातील आहेत. त्यामुळे काँग्रेससमोर मोठे आवाहन आहे.

जागा वाटपामध्ये जास्त जागा मिळाव्यात म्हणून मणिकम हे आग्रही होते. शिवाय ज्या जागांवर विजय मिळवणे डीएमकेसाठी अवघड जात आहे त्या जागा काँग्रेसला सोडल्याने काँग्रेसचे उमेदवार विजयी होण्याची शक्यता देखील कमी आहे.

यावर नाराजी व्यक्त करत मणिकम यांनी काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जून खर्गे यांच्याकडे आपला निवडणूक व्यवस्थापन आणि समन्वय समितीचा राजीनामा सुपूर्द केला.

MP Manickam Tagore Resigns
MLA Pension News : आमदारांनो, वारं फिरलं! पक्षांतर कराल तर पेन्शन विसरा, लगेच चौघांना दणका; ‘या’ राज्याने केला कायद्यात मोठा बदल

तमिळनाडूमध्ये तिरंगी लढत

तामिळनाडू निवडणुकीत तिरंगी लढत होत आहे. या लढतीमध्ये काँग्रेस डीएमकेसोबत आघाडीमध्ये आहे. तर, त्यांच्या विरोधात एडीएमके आहे. तर अभिनेता विजयचा

तमिळगा वेत्री कळघम पक्ष देखील निवडणुकीच्या मैदानात आहे. त्यामुळे या तिरंगी लढतीत कोण बाजी मारणार याची चर्चा आहे.

MP Manickam Tagore Resigns
Congress MLA : काँग्रेस आमदाराचे पद घालविण्यासाठी मध्यरात्री विधानसभेत मोठ्या हालचाली; प्रमुख सचिवांनी आदेश काढलाच...

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com