Sheikh Hasina Sarkarnama
देश

Why can't Sheikh Hasina go to Britain : शेख हसीना यांना ब्रिटनने आश्रय नाकारला, 'हे' आहे कारण!

Rashmi Mane

Shaikh Hasina News : बांगलादेशच्या माजी पंतप्रधान शेख हसीना यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होतांना दिसत आहे. पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना बांगलादेश (Bangladesh) सोडून सोमवारी भारतात आल्या. त्यांना स्वतःच्याच देशातून पळून यावे लागले आणि आता परदेशात आश्रय घेण्यासाठीही त्यांची धडपड सुरू आहे. पण शेख हसीना यांना कोणत्या देशात आश्रय मिळणार हे पाहणे महत्त्वाचे आहे.

बांगलादेशात सध्या अस्थिरतेचे वातावरण आहे, विद्यार्थांच्या आंदोलनाने आता हिंसक वळण घेतले आहे. आंदोलकांकडून मोठ्या प्रमाणात तोडफोड आणि जाळपोळ सध्या सुरु आहे. हल्लेखोर तिथे अल्पसंख्याक असलेल्या हिंदूंना टार्गेट करत असल्याच्या बातम्या समोर येत आहेत. त्यामुळे तिथल्या हिंदूबाबत आता चिंता व्यक्त केली जात आहे.

शेख हसीना सध्या भारतात आहेत. पण त्या इथे जास्त काळ राहू शकत नाहीत. हसीना यांनी ब्रिटनकडे आश्रयाचे मागणी केली आहे. पण शेख हसीना यांना ब्रिटनमध्ये आश्रय मिळणे इतके सोपे नाही. ब्रिटन शेख हसीनाला आश्रय देण्यास फारसा तयार दिसत नाही. अशा परिस्थितीत पुढील काही दिवस त्याचा भारतातला (India) मुक्काम वाढण्याची शक्यता आहे.

ब्रिटनला का जाऊ शकत नाहीत शेख हसीना?

ढाका सोडल्यानंतर शेख हसीना यांची नजर फक्त ब्रिटनमध्ये जाण्याची इच्छा होती. मात्र, यूके इमिग्रेशन नियमांनुसार, यूके बाहेरून तिथे जाण्यासाठी अर्ज करणे सहज शक्य नाही. UK मधील राहण्यासाठी अर्ज केलेल्यांचा अतिशय काळजीपूर्वक व्हिसा देण्याबाबत विचार केला जातो. शेख हसीना यांच्याकडे डिप्लोमॅटिक व्हिसा नसल्याचे सांगण्यात येत आहे. अशा स्थितीत तो ब्रिटनमध्ये प्रवेश करू शकत नाही.

अमेरिकेची दरवाजे शेख हसीनासाठी बंद

ब्रिटनसोबतच अमेरिकेचे दरवाजेही शेख हसीना यांच्यासाठी बंद झाले आहेत. अमेरिकेने शेख हसीनाचा व्हिसा रद्द केला आहे. अशा परिस्थितीत आता शेख हसीना यांना दुसऱ्या देशांकडे आश्रयासाठी मदत मागावी लागणार आहे. अशा परिस्थितीत हसीना पुढील काही दिवस भारतात राहू शकतात. शेखा हसीना आता संयुक्त अरब अमिराती (UAE), बेलारूस, कतार, सौदी अरेबिया आणि फिनलंडसह इतर अनेक पर्यायांवर विचार करत आहेत अशी माहिती समोर येत आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT