Mumbai| GIFT City Sarkarnama
देश

Gujarat GIFT City : गुजरातमधील ‘गिफ्ट सिटी’ने मुंबईला मागे टाकले; GFCI रँकिंगने वाढवले महाराष्ट्राचे टेन्शन

GIFT City in Gujarat Rises as Financial Tech City: मुंबई ही देशाची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. गुजरातमधील गिफ्ट सिटीही आता फायनान्स टेक-सिटी म्हणून पुढे येत आहे.

Rajanand More

Mumbai News : गुजरातमधील गांधीनगर येथील गिफ्ट सिटीने ग्लोबल फायनान्शिअल सेंटर्स इंडेक्स (GFCI) मध्ये मुंबईला मागे टाकले आहे. या अहवालानुसार आशिया/पॅसिफिक विभागात गिफ्ट सिटी 52 व्या तर मुंबई 54 व्या क्रमांकावर आहे. मुंबईचे रेटिंग एक अंकाने कमी झाले आहे.

विधानसभा निवडणुकीच्या प्रचारात सध्या मुंबई, महाराष्ट्रातील उद्योगधंदे गुजरातला पळवले जात असल्याचा आरोप महाविकास आघाडीच्या नेत्यांकडून केला जात आहे. या आरोपांना आता धार आली आहे. शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते अंबादास दानवे यांनी Z/yen रिपोर्टचा हवाला देत महायुतीवर टीका केली आहे.

दानवे यांनी ‘एक्स’वर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे की, गिफ्ट सिटीने मुंबईला मागे टाकले आहे. महाराष्ट्र आणि मुंबईचे महत्व कमी करण्यासाठी मोदींचे प्रयत्न कायम सुरू आहेत, हे स्पष्ट आहे. कस्टम, आयकर आणि जीएसटीमध्ये सवलतींचा वर्षाव गुजरातेत होतो, मग हे मुंबईत का शक्य नाही?

GFCI Ranking

सर्वाधिक जीएसटी महाराष्ट्रातून थैल्या भरून न्यायचा आणि हातात कटोरा द्यायचा. हेच यांचे ध्येय आणि धोरण. महाराष्ट्रात हे गुजरात धार्जिणे सरकार आहे. महायुतीच्या नेत्यांना 'जय महाराष्ट्र' म्हणण्याचा हक्क नाही! महायुती मुळासकट काढायची यंदा, असा हल्ला दानवे यांनी केला.  

काय आहे गिफ्ट सिटी?

गुजरातमधील गांधीनगर येथे गुजरात सरकार आण विविध कंपन्यांच्या संयुक्त प्रयत्नातून गुजरात इंटरनॅशनल फायनान्स टेक-सिटी म्हणजेच गिफ्ट सिटी हे एक व्यापारी शहर उभारण्यात आले आहे. आंतरराष्ट्रीय वित्तीय सेवा केंद्र म्हणून हे शहर नावारुपाला येऊ लागले आहे.

गिफ्ट सिटीमध्ये आंतरराष्ट्रीय आर्थिक व्यापारी केंद्र आणि विशेष निर्यात उद्योग केंद्र स्थापन करण्यात आले आहे. देशातील उद्योगांना सुरूवातीची दहा वर्षे इन्कम टॅक्समध्ये सवलत देण्यात येते. त्याचप्रमाणे नोंदणी शुल्क, मुद्रांक शुल्क तसेच इतर कर सवलतीही दिल्या जात आहेत.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT