Babanrao Lonikar Video : मराठा समाजाबाबत केलेलं 'ते' वादग्रस्त वक्तव्य भाजप उमेदवाराला भोवणार?

Controversial remarks about Maratha community: "आष्टीचं कौतुक करताना मी, मराठा समाजाची मतं या गावात कमी आहेत. हे गाव SC, ST, OBC, व्हीजेएनटी, मुस्लिम अशा अठरापगड जातीचं आहे. शिवाय मराठा समाजाची 60 ते 70 टक्के मला भाजपला मिळतात. पण काँग्रेसमधून हकालपट्टी केलेल्या लोकांनी मोडतोड करुन माझा व्हिडिओ व्हायरल केला आहे."
Babanrao Lonikar
Babanrao LonikarSarkarnama
Published on
Updated on

Jalna News, 12 Nov : माजी मंत्री आणि परतुरचे भाजप उमेदवार बबनराव लोणीकर यांची मराठा समाजाबाबत केलेल्या एका वक्तव्यामुळे चांगलीच कोंडी झाली आहे. 'मराठा समाजाची मतं बोटाच्या कांड्यावर मोजण्या इतकी आहेत.' असं वक्तव्य त्यांनी आष्टीतील प्रचारसभेतील केलं आहे.

त्यांच्या या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. लोणीकर यांच्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसंच मराठा (Maratha) समाजाकडून नाराजी व्यक्त केली जात आहे. ऐन निवडणुकीच्या तोंडावर केलेल्या या वक्तव्यामुळे त्यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.

बबनराव लोणीकर नेमकं काय म्हणाले?

बबनराव लोणीकरांनी व्हिडीओमध्ये म्हटलं की, " या गावात अठरापगड जातीचे लोक आहेत. मराठा समाजाची गावात कांड्यावर मोजण्याइतकी मतं आहेत. मात्र, हे गाव सर्व समाजाचे आहे. गावातील सर्व जातीधर्माचे लोक माझ्याबरोबर आहेत. मराठा, धनगर, माळी, फुलारी, आगलावे, शेट्ट्ये, कांदारे, कांबळे असा सगळा समाज माझ्याबरोबर आहे. मी 40 वर्षे राजकारणात असून सगळेजण माझ्यावर प्रेम करतात."

Babanrao Lonikar
Raosaheb Danve : दानवेसाहेब हे वागणं बरं नव्हं! कार्यकर्त्याला लाथ मारल्याचा VIDEO होतोय व्हायरल

लोणीकरांचं स्पष्टीकरण

मात्र, मराठा समाजाची मतं बोटाच्या कांड्यावर मोजण्याइतकी असल्याच्या वक्तव्यामुळे त्यांच्यावर टीका केली जात आहे. तर आपण जे बोललो त्या वक्तव्याची मोडतोड करुन व्हिडिओ व्हायरल केला जात असल्याचं स्पष्टीकरण लोणीकरांनी दिलं आहे. ते म्हणाले, आष्टी गावात माझ्या रॅलीला खेड्यापाड्यातील कार्यकर्ते आले होते.

Babanrao Lonikar
Eknath Shinde : चांदिवलीत राडा! संतापलेले CM शिंदे थेट काँग्रेसच्या कार्यालयात शिरले, VIDEO आला समोर

यावेळी आष्टीचं कौतुक करताना मी, मराठा समाजाची मतं या गावात कमी आहेत. हे गाव एससी, एसटी, OBC, व्हीजेएनटी, मुस्लिम अशा अठरापगड जातीचं आहे. शिवाय मराठा समाजाची 60 ते 70 टक्के मला भाजपला मिळतात. पण काँग्रेसमधून हकालपट्टी केलेल्या लोकांनी मोडतोड करुन माझा व्हिडिओ व्हायरल केला असून तो खोटा आहे."

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com