Priyanka Chaturvedi criticism : भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्याला थोड्याच वेळात सुरूवात होत आहे. जम्मू-काश्मीरमधील पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत-पाकिस्तान या सामन्यानिमित्ताने आमने-सामने येत आहे. पाकिस्तानस्थित दहशतवादाला भारतीय लष्काराने ऑपरेशन सिंदूरद्वारे चोख प्रत्युत्तर दिले. परंतु या क्रिकेट सामन्यावरून केंद्रातील भाजप पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारवर आणि 'बीसीसीआय'वर सडकून टीका होत आहे.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेना पक्षाने आज राज्यासह देशभरात या सामन्याविरोधात निदर्शने करत विरोध दर्शवला. खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी हा सामना भारताचा नसून, बीसीसीआय टीम खेळत आहे. या सामन्याद्वारे मिळणारा महसूल, दहशतवादाला पोसणाऱ्या देशाला जाणार असल्याने, हा सामना बायकाॅट करा, असे आवाहन केलं आहे.
खासदार प्रियंका चतुर्वेदी म्हणाल्या, "भारत-पाकिस्तान सामना हा भारतविरुद्ध पाकिस्तान नसून, बीसीसीआय' टीमविरुद्ध पाकिस्तान, असा आहे. संपूर्ण देशवासियांना बीसीसीआय आणि केंद्र सरकारला विनंती केली होती की, हा सामना खेळवला जाऊ होऊ नये. सर्व विनंती सत्ताधाऱ्यांनी फेटाळून लावल्या." ही मॅच (Cricket) कोणत्या कारणास्तव होते, का हिरवा झेंडा दाखवला याच्यावर सत्ताधाऱ्यांकडून वेगवेगळ्या प्रकारचे अपिल केले जात आहे. मात्र या अपिलांना काहीच अर्थ नाही, असा टोला प्रियंका चतुर्वेदी यांनी लगावला.
''ऑपरेशन सिंदूर'नंतर सांगितलं गेलं की, पाकिस्तानला (Pakistan) जशास तसे उत्तर देऊ. प्रत्येक पातळीवर त्यांची कोंडी करू. चर्चा होईल तर, 'पीओके'वरच चर्चा होईल. यावेळी असं सांगितलं नाही की, क्रिकेट मॅच खेळली जाईल. संपूर्ण देशवासीयना ही मॅच नको आहे. भारत-पाकिस्तान सामन्यांमध्ये टीम इंडिया नसून टीम 'बीसीसीआय' आहे,' असा घणाघात प्रियंका चतुर्वेदी यांनी केला.
'केंद्र सरकार अन् 'बीसीसीआय'ने काहीच केलं नाही. पण आपल्या हातामध्ये या मॅचवर बहिष्कार टाकता येईल, असे नियोजन आहे. लाईव्ह टेलिकास्ट पाहू नका. पाकिस्तानने यापूर्वी देखील आपल्याविरुद्ध खेळलेला नाही. 1990 च्या काळामध्ये पाकिस्तानने भारताविरुद्ध खेळण्यास मनाई केली होती. आशियाई हॉकी कपमध्ये खेळण्यास पाकिस्तानने साफ नकार दिला होता. भारताने त्यावेळेस पाकिस्तान टीमसाठी रेड कार्पेट टाकलं होतं. पण त्यांनी मनाई केली,' याची आठवण प्रियंका चतुर्वेदी यांनी करून दिली.
''बीसीसीआय' टीमने पाकिस्तानविरुद्ध मॅच जिंकल्या दहशतवादी हल्ल्यातील मयतांना हा विजय, समर्पित केला जाईल, असे सरकार बोंब ठोकणार. परंतु या मॅचमध्ये जो महसूल गोळा होईल, तो ज्या टीमला जाणार आहे, असीम मुनीर याच्याबरोबर उभे राहून आपल्या देशाविरुद्ध खूप स्टोरीज बनवल्या आहेत, इंस्टाग्राम स्टोरी बनवल्या आहेत आणि बेलगामपणे दहशतवादी हल्ल्यावर टाळ्या वाजवल्यांना जाणार आहे, याकडे प्रियंका चतुर्वेदी यांनी लक्ष वेधले.
'या मॅचमधून गोळा होणारा महसूल ज्या देशाला जाणार आहे, त्यांनी आपल्या देशामध्ये दहशतवादी हल्ला घडवून आणला. दहशतवाद्यांना मदत केली आहे, प्रशिक्षण दिले आहे, शस्त्र दिलेले आहेत, अशा देशाला या मॅचमधून महसूल मिळणार आहे, हे देशवासियांनी विसरून नये,' असेही प्रियंता चतुर्वेदी यांनी म्हटले.
'दहशतवादी हल्ल्यात मयत झालेल्या कुटुंबियांबरोबर देशाने अशावेळी एक साथ उभे राहिले पाहिजे. अशा या मॅचला बायकॉट केलेच पाहिजे. देशातील मुक्या-बहिऱ्या सरकारला जशास तसे उत्तर देण्याची हीच वेळ आहे. या बायकॉटच्या माध्यमातून सरकारला उत्तर दिलेच पाहिजे,' असे आवाहन प्रियंका चतुर्वेदी यांनी केले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.