Maharashtra Politics : दिल्लीत 'ऑपरेशन टायगर'ची चर्चा सुरू असतानाच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून सर्व खासदारांसाठी व्हीप जारी करण्यात आला होता. गुरूवारी तातडीने बोलविलेल्या संसदीय दलाच्या बैठकीला उपस्थित राहण्याचे आदेश खासदारांना देण्यात आले होते. या बैठकीवरच ऑपरेशन टायगर यशस्वी झाले की नाही, हे स्पष्ट होणार आहे.
लोकसभेतील संसदीय दलाचे नेते अरविंद सावंत यांनी बुधवारी व्हीप जारी केला होता. त्यानुसार संसद भवनात खासदार संजय राऊत यांच्या कार्यालयात बैठकीला सुरूवात झाली असून आतापर्यंत केवळ चार खासदार उपस्थित आहेत. बुधवारी दिल्लीत झालेल्या पत्रकार परिषद घेतलेल्या राऊतांसह खासदार अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे हे चौघेत बैठकीला पोहचले आहे.
ऑपरेशन टायगरमध्ये नाव येत असलेल्या सहा खासदारांपैकी एकाही खासदाराने बैठकीला हजेरी लावलेली नाही. त्यामुळे एकनाथ शिंदे यांचे ऑपरेशन यशस्वी झाल्याची जोरदार चर्चा आहे. दरम्यान, बैठकीला हजर न राहिल्यास संबंधित खासदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी लोकसभा अध्यक्षांकडे केली जाऊ शकते. याबाबत गुरूवारी सकाळीच राऊतांनी संकेत दिले आहेत.
बैठकीला गैरहजर राहणाऱ्या खासदारांना नोटीस बजावली जाईल, असे राऊत म्हणाले आहेत. आता बंड करण्याच्या तयारीत असलेले खासदार गैरहजर राहिल्याने ठाकरेंच्या शिवसेनेची पुढील भूमिका काय असणार, याबाबत उत्सुकता वाढली आहे. सहा खासदारांनी वेगळा गट स्थापन करून तसे पत्र बुधवारीच लोकसभा अध्यक्षांना दिल्याचीही चर्चा आहे. मात्र, त्याबाबतची अधिकृत माहिती अद्याप समोर आलेली नाही.
बंड केलेले सहा खासदार पुढील दोन-तीन दिवसांत एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश करण्याची शक्यता आहे. ठाकरेंच्या पक्षाने व्हीप जारी केला असला तरी तो बेकायदेशीर ठरू शकतो. लोकसभेतील कामकाजाबाबतच व्हीपचा वापर करता येऊ शकतो. पक्षाच्या बैठकीसाठी व्हीप लागू होत नाही. त्यामुळे या खासदारांवर कारवाई होऊ शकत नाही. तसेच व्हीप काढण्याआधीच दोन तृतियांश सदस्यांनी लोकसभा अध्यक्षांना वेगळ्या गटाचे पत्र दिले असल्यास त्यांच्यावर अपात्रतेची कारवाईही होऊ शकत नाही. त्यामुळे खासदार गैरहजर राहूनही कारवाई होऊ शकत नाही, असे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.