Rajabhau Waje news : दिल्लीत पोहोचलेल्या राजाभाऊ वाजेंच्या डोळ्यात अश्रू तरळले; भर पत्रकार परिषदेत झाले भावूक...

Shiv Sena UBT news : महाराष्ट्रातील जनता एकदा गप्प बसली. आता गप्प बसणार नाही. ज्यांना जायचंय त्यांनी आधी राजीनामा द्यावा, असे संजय राऊत म्हणाले आहेत.
Rajabhau Waje in Delhi
Rajabhau Waje in DelhiSarkarnama
Published on
Updated on

Operation Tiger news : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातील सहा खासदार फुटणार असल्याची जोरदार चर्चा आहे. या चर्चेनंतर दिल्लीत पक्षाच्या एकूण नऊ खासदारांनी आज एकत्रितपणे पहिल्यांदाच तीन खासदार मीडियासमोर आले. अरविंद सावंत, अनिल देसाई आणि राजाभाऊ वाजे या तीन खासदारांनी पत्रकार परिषदेला सामोरे जात आपण ठाकरेंसोबतच असल्याचे दाखवून दिले. मात्र, यावेळी वाजेंचे कौतुक होत असताना त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे दिसून आले.

खासदार संजय राऊत यांच्या निवासस्थानी झालेल्या पत्रकार परिषदेत त्यांना वाजेंचे खास कौतुक केले. राऊत म्हणाले, राजाभाऊ वाजे यांचे खास कौतुक आणि अभिनंदन केले पाहिजे. ते पहिल्या दिवसापासून सांगत आहेत की, मी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत आहे. ते राजधानी एक्सप्रेसमधून उतरले. तिथेही त्यांचे तेच वाक्य होते. याला आम्ही निष्ठा म्हणतो, श्रध्दा म्हणतो.

खासदारक्या-आमदारक्या येतात आणि जातात. आज आम्ही आज आम्ही खासदार आहोत, उद्या नसू. पण ज्या पक्षाने आम्हाला आतापर्यंत दिले आहे, ते आम्हाला विसरता येणार नाही. बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला मुलासारखं वाढवलं. उध्दव ठाकरेंनी आमच्यावर भावासारखं प्रेम केलं. हे जाणारे बेईमान लोक आहेत, त्यांच्या रक्तातच बेईमानी असल्याचे आता वाटत आहे. मी कोणताही पक्ष आणि कोणत्या व्यक्तीचे नाव घेत नाही, असेही संजय राऊत यांनी सांगितले.

Rajabhau Waje in Delhi
Shiv Sena UBT news : ऑपरेशन टायगरवर शिक्कामोर्तब होण्याआधीच ठाकरेंचे तीन खासदार आले समोर; राऊत म्हणाले, जो काय राडा व्हायचाय तो होईल...

संजय राऊत बोलत असतानाच वाजे हे काहीसे भावूक झाल्याचे दिसून आले. त्यांचा हात दोनदा डोळ्यांवर गेला. त्यांच्या डोळ्यात अश्रू तरळल्याचे जाणवत होते. मुंबईत झालेल्या ठाकरेंसोबतच्या बैठकीलाही वाजे उपस्थित होते. तसेच ते मीडियासमोर बोलतानाही सातत्याने सांगत होते की, आपण ठाकरेंसोबत आहे आणि पुढेही त्यांच्यासोबतच असू. आजही ऑपरेशन टायगरची चर्चा सुरू असताना ते दिल्लीत संजय राऊत यांच्या निवासस्थानी आहेत. त्यामुळे राऊतांनी पत्रकार परिषदेत आवर्जून त्यांच्या पक्षनिष्ठेचा उल्लेख करत पक्ष सोडून जाणाऱ्या सर्वपक्षीय खासदारांचा खरपूस समाचार घेतला.

दरम्यान, राऊत यांनी फुटीच्या चर्चांवर बोलताना सांगितले की, आमच्या खासदारांची नावे येत आहेत, ते कुठे आहेत ते माहिती नाही. ते सर्व खासदार शिवसेनेच्या मशाल चिन्हावर आणि उद्धव ठाकरेंच्या चेहऱ्यावर निवडून आले आहेत. मागे जे काही झाले, त्याची पुनरावृत्ती पुन्हा होणार असेल तर यावेळी जनता आणि शिवसैनिक गप्प बसणार नाहीत. जो काय राडा व्हायचाय तो होईल. ही डरपोकगिरी आता खपवून घेतला जाणार नाही, असा इशारा राऊतांनी दिला.

Rajabhau Waje in Delhi
TMC Split News : शिंदेंचे वकील महेश जेठमलानी अन् लोकसभेतील निवृत्त अधिकाऱ्याने वाढविले टेन्शन; पक्ष-चिन्हावरील दावा, विलीनीकरणाचे काय होणार?

महाराष्ट्रातील जनता एकदा गप्प बसली. आता गप्प बसणार नाही. ज्यांना जायचंय त्यांनी आधी राजीनामा द्यावा. आमच्या मतदारांनी तुम्हाला निवडून दिले आहे, असेही राऊत म्हणाले. पक्षाने कायदेशीर बाबी सुरू केल्या आहेत. अरविंद सावंत यांनी व्हीप जारी केला आहे. उद्या संसदीय दलाची बैठक आहे. ओम बिर्ला यांनाही पत्र लिहिण्यात आले असल्याची माहिती राऊत यांनी दिली.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com