Sanjay Raut shares an image of pothole-ridden roads in Varanasi Sarkarnama
देश

Sanjay Raut ON PM Modi: राऊतांनी दाखवला मोदींच्या मतदारसंघातील 'विकास'; सोशल मीडियावर फोटो शेअर

Sanjay Raut Criticizes PM Modi’s Foreign Tour:पावसामुळे वाराणसी शहरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मोदींच्या मतदारसंघाची ही अवस्था आहेत तर अन्य शहरात काय परिस्थिती असेल, असे संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

Mangesh Mahale

पंतप्रधान नरेंद्र मोदी हे सध्या विविध देशांच्या दौऱ्यावर आहेत. घाना, त्रिनिदाद टोबॅगो, अर्जेंटिना, ब्राझील आणि नामिबिया या देशांना ते भेटी देत आहेत. भारताच्या विकासाबाबात मोदी ते तेथील जनतेशी माहिती देत आहे.

मोदी विदेशात भारताच्या विकासाची माहिती देत असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी सोशल मीडियावर फोटो शेअर करीत त्यांची खिल्ली उडवली आहे.

नरेंद्र मोदी ज्या मतदारसंघातून लोकसभेत निवडून गेले आहे. त्या वाराणसी शहराची काय अवस्था झाली आहे, हे राऊतांनी शेअर केलेल्या फोटोतून दिसत आहे. पावसामुळे वाराणसी शहरातील रस्त्याची दुरवस्था झाली आहे. मोदींच्या मतदारसंघाची ही अवस्था आहेत तर अन्य शहरात काय परिस्थिती असेल, असे संजय राऊतांनी अप्रत्यक्षपणे सांगितले आहे.

मोदी यांना घानाचा सर्वोच्च नागरी पुरस्कार Companion of the Order of the Star of Ghana या पुरस्कारानं सन्मानित करण्यात आले आहे. येत्या ६ आणि ७ तारखेला रिओ दी जिनेरो याठिकाणी होणाऱ्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. ब्राझीलचे अध्यक्ष लुईस इनासियो लुला दा सिल्वा यांच्याशीही ते चर्चा करणार आहेत.

दोन्ही नेत्यांनी व्यापार, गुंतवणूक, शेती, डिजिटल तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा अशा विविध क्षेत्रात द्विपक्षीय भागीदारी वाढवण्याविषयी सहमती दर्शवली. संस्कृती, मानकं, आयुर्वेद आणि पारंपरिक औषधं या क्षेत्रांमधल्या चार सामंजस्य करारांवर त्यांनी स्वाक्षऱ्या केल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT