Eknath Shinde News, Devendra Fadnavis News, Political News
Eknath Shinde News, Devendra Fadnavis News, Political News Sarkarnama
देश

Eknath Shinde Update : भाजपच्या बड्या नेत्यानेच केली सुरतमधील बडदास्त

ज्ञानेश सावंत : सरकारनामा ब्युरो

मुंबई : शिवसेना (Shivsena) सध्या फुटीच्या उंबरठ्यावर येवून ठेपली आहे. नगरविकास मंत्री आणि शिवसेनेतील मोठे नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी तब्बल ३५ आमदारांना सोबत घेवून बंड पुकारले आहे. काल विधान परिषदेचा निकाल लागल्यानंतर शिंदे यांनी आमदारांसोबत गुजरातमधील सुरत येथील 'ली मेरेडियन' हे हॉटेल गाठले आहे. त्यामुळे शिवसेनेसह राजकीय गोटात सध्या मोठी खळबळ उडाली असून ठाकरे सरकार संकटात सापडले आहे. (Eknath Shinde latest News)

मात्र शिवसेनेत (Shivsena) बंड होऊन एकनाथ शिंदे आणि काही आमदार फुटणार असल्याची कल्पना भाजपमधील एका बड्या नेत्यांला सोमवारीच होती. या बड्या नेत्यांशी हातमिळवणी करूनच शिंदे यांनी थेट गुजरात गाठल्याचेही समोर आले आहे. दुसरीकडे, गुजरातमध्येच शिंदेसह त्यांच्या आमदारांची बडदास्त ठेवून त्यांना सुरक्षित ठेवण्याचीही जबाबदारी या बड्या नेत्यांनेच उचलली असल्याचे सांगण्यात येत आहे. त्यामुळे शिंदेंच्या नाराजीचा फायदा उठवून ठाकरे सरकारला खिंडीत गाठण्याचा डाव भाजपने टाकल्याचे दिसत आहे. राजकीय घडामोडीनंतर शिंदे नेमकी काय भूमिका घेतात, याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले आहे. (Eknath Shinde news in marathi)

शिवसेनेत विशेषत: स्वपक्षीय आमदारांत बळ वाढलेले शिंदे नेहमीच भाजपसाठी आशेचा किरण ठरले आहेत. याआधी शिंदे नाराज आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे शिंदेंना जमू देत नाहीत, त्यांच्यावर दबाव आणत असल्याच्या कारणे काढून भाजप नेते शिवसेना आणि शिंदेंना डिवचत असतात. त्यावर काहीच शिंदेंनी सडेतोड उत्तर दिले नाही. त्यामुळे शिंदेबाबत नेहमीच संशय व्यक्त केला जात होता. ठाकरेंपासून शिवसेनेच्या बहुतांशी मंत्री, नेते आणि आमदारांभोवती चौकशांचे फास आवळणाऱ्या केंद्रीय यंत्रणांनी शिंदेंकडे कधीच वाकड्या नजरेने पाहिले नाहीत. तसे धाडस तेही करू शकले नाहीत.

भाजप आणि शिंदे यांच्यातील 'छुपी' जवळीक पाहता, शिंदे हे त्यांच्या २५ आमदारांसह भाजपच्या साथीला जाणार असल्याचे चर्चा मध्यंतरी रंगली होती. तसे जाहीर निमंत्रण भाजपच्या एका नेत्यानेही दिले होते. राज्यसभा निवडणुकीत फोडाफोडी झाल्यानंतर शिंदे समर्थकांवर संशय व्यक्त गेला होता. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे दिसून आले. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र, ठाकरे आणि शिंदे यांच्यातील मतभेदाच्या घटना पुढे आल्या. त्यात विधान परिषदेच्या निकाल भाजपच्या बाजुने लागला आणि शिवसेनेची मते फुटल्याचे स्पष्ट झाले. हा निकाल येण्याआधीच शिंदे आणि त्यांचे समर्थक आमदार विधान भवनातून बाहेर पडले.

शिंदेच्या गोटातील हालचालींवर भाजपमधील बड्या नेत्यांनी बारकाईने लक्ष ठेवल्याचे सांगण्यात येत आहेत. त्यातून शिंदे हे बंड करतील आणि नव्या राजकीय घडामोडी घडतील, याचे संकेत बड्या नेत्यांनी दिले होते. मात्र, शिवसेना नेतृत्वाला गाफील ठेवून शिंदे यांनी अखेर ऐन अडचणीच्या काळातच आपली नाराजी उघड केली. (Eknath Shinde in Gujrat)

दुसरीकडे, शिंदे यांनी आपला मुक्काम सुरतमध्ये हलविल्याने ठाकरे सरकारला इशारा देऊन थेट पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या पोटात गोळाच आणल्याचे दिसत आहे. शिंदे आणि त्यांच्या आमदारांची आपल्या 'होम पीच' वर शाही व्यवस्था ठेवण्यात भाजपनेही आपली यंत्रणा कामाला लावल्याचे सांगण्यात येत आहे. शिंदेंच्या पवित्र्यानंतर राजकीय घडामोडींना प्रचंड वेग आला असून, बैठकांपाठोपाठ बैठक सुरू झाल्या आहेत.

शिवसेनेतील नाराजीनाट्यावरून काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसही हवालदिल झाल्याचे दिसत आहे. दोन्ही काँग्रेसच्या नेत्यांनी आपापल्या नेत्यांना तातडीने बोलावून चर्चा सुरू केल्या आहेत. परिणामी, राज्यसभा, विधान परिषदेच्या धक्कादायक निकालानंतर तितक्याच धक्कादायक नवे राजकीय समीकरण आकाराला येण्याची चिन्हे तुर्त तरी दिसत आहेत.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT