शिंदे सुरतमार्गेच भाजपमध्ये जाणार? गायब आमदारांच्या नावांची यादी 'गुजराती'मध्ये व्हायरल

एकनाथ शिंदे यांच्यासर चार मंत्री आणि पंचवीसहून अधिक आमदार गुजरातमध्ये.
Eknath Shinde Latest Marathi News
Eknath Shinde Latest Marathi News Sarkarnama
Published on
Updated on

मुंबई : शिवसेनेचे नेते, नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे हे बंड काय करतायेत... या बंडाची पूर्वकल्पना भाजपच्या गोटात आधीच पसरतेय...शिंदेंचा मुक्काम सुरतमध्ये हलतोय... ते शिवसेनेतून फुटून भाजपात सामील होण्याची चर्चा रंगतेय... शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या आमदारांच्या नावांची यादी गुजराती भाषेत तयार होतेय... ती थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शहांकडे जातेय.... तशी चर्चा जोर धरतेय... या घडोमोडींनी तर खरोखरीच मातोश्री, वर्षा आणि सह्याद्री अतिथीगृहाला जोरदार हदरे बसतायेत. त्यातून आता शिंदे हे गुजरातमार्गेच भाजपच्या (BJP) तंबूत दाखल होण्याची अटकळ बांधली जातेय. (Eknath Shinde Latest Marathi News)

शिवसेना (Shiv Sena) नेतृत्वावर नाराज असलेल्या शिंदे यांनी बंडाचे निशाण हातात घेऊन सुरत गाठली आणि ठाकरे सरकारचा ढाचाच कोसळण्याचे चित्र उभे केले. शिंदे हे इतरत्र कुठेही जाऊ शकले असते; पण ते गुजरातमध्ये गेल्यानेच त्यांच्या भूमिकेकडे संशयाने पाहिले जात आहे. महाराष्ट्रातील भाजपच्या एका बड्या नेत्याच्या पुढाकारातून गुजरात निवडलेल्या शिंदेंसोबत चार मंत्री आणि १७ आमदार आहेत. ही संख्या पाहता ठाकरे सरकार पडून, राज्यातील पुन्हा भाजप सत्तास्थापन करण्याचा अंदाज बांधला जात आहेत.

Eknath Shinde Latest Marathi News
एकनाथ शिंदेंशी संपर्क झाला, चंद्रकांत पाटील यांनीच सगळी व्यवस्था केलीय! संजय राऊतांचं मोठं विधान

त्यात विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे दिल्लीला रवाना झाले आहेत. तर सुरतमध्ये असलेल्या शिंदेच्या व्यवस्थेत शहांची टीम असल्याचेही सांगण्यात येत आहेत. त्यात शिंदे आणि त्यांच्यासोबतच्या साऱ्यांच्या नावांची विशेष यादी गुजरातील भाषेत तयार करण्यात आली आहे. ती गुजरातमधील प्रमुख नेत्यांसह मोदी, शहांकडेही पाठवली गेल्याची चर्चा आहे. आधी सुरत, त्यात भाजपचा नेत्यांचा हात आणि आता गुजराती भाषेतील यादीवरून शिंदे आणि भाजप यांच्यात नवी सोयरीक होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

शिवसेनेत विशेषत: स्वपक्षीय आमदारांत बळ वाढवून आलेले शिंदे हे नेहमीच भाजपसाठी आशेचा किरण ठरले आहेत. याआधी शिंदे नाराज आहेत, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे शिंदेंना जमू देत नाहीत, त्यांच्यावर दबाव आणत असल्याच्या कारणे काढून भाजप नेते शिवसेना आणि शिंदेंना डिवचत असतात. त्यावर काहीच शिंदेंनी सडेतोड उत्तर दिले नाही. त्यामुळे शिंदेबाबत नेहमीच संशय व्यक्त केला जात होता.

Eknath Shinde Latest Marathi News
Eknath Shinde News : शिवसेनेच्या 'या' चार मंत्र्यांसह वीसहून अधिक आमदार नॉट रिचेबल

ठाकरेंपासून शिवसेनेच्या बहुतांशी मंत्री, नेते आणि आमदारांभोवती चौकशांचे फास आवळणाऱ्या केंद्रीय यंत्रणांनी शिंदेंकडे कधीच वाकड्या नजरेने पाहिले नाहीत. तसे धाडस तेही करू शकत नाही. भाजप आणि शिंदे यांच्यातील 'छुपी' जवळीक पाहता, शिंदे हे त्यांच्या २५ आमदारांसह भाजपच्या साथीला जाणार असल्याचे चर्चा मध्यंतरी रंगली होती. तसे जाहीर निमंत्रण भाजपच्या एका नेत्यानेही दिले होते. राज्यसभा निवडणुकीत फोडाफोडी झाल्यानंतर शिंदे समर्थकांवर संशय व्यक्त गेला होता. मात्र, त्यात तथ्य नसल्याचे दिसून आले. त्यानंतर विधान परिषदेच्या निवडणुकीत मात्र, ठाकरे आणि शिंदे यांच्यातील मतभेदाच्या घटना पुढे आल्या.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com