Maashal
Maashal Sarkarnama
देश

Shivsena : 'मशालीचा' वाद अखेर शमला : समता पार्टीची याचिका फेटाळली!

सरकारनामा ब्यूरो

दिल्ली : शिवसेनेतल्या अभूतपूर्वपूर्व फुटीनंतर शिवसेनेचे दोन गट निर्माण झाले. पक्षावर दावा करण्य़ासाठी शिंदे गटाने सर्वोच्च न्यायालयासोबतच केंद्रिय निवडणूक आयोगाचे दार ठोठावले होते. यानंतर आयोगाने शिवसेना ठाकरे गटाला मशाल तर शिवसेना शिंदे गटाला ढाल तलवार हे चिन्ह दिले होते.मात्र ठाकरे गटाच्या मशाल चिन्हावर समता पार्टीने दावा करत, सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. आता ही याचिका न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

केंद्रीय निवडणूक आयोगाने धनुष्यबाण हे चिन्ह गोठविले होते. त्यानंतर ठाकरेंना मशाल चिन्ह बहाल करण्यात आले. समता पार्टीने ठाकरे गटाच्या विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याआधीच निवडणूक आयोगाने समता पक्षाला Unrecognised Party म्हणून जाहीर केलं आहे. मशाल चिन्ह आमच्या पार्टीचे असल्याचा दावा समता पार्टीने केला होता. त्यामुळे अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत ठाकरे गटाला चिन्ह देऊ नये, अशी याचिका समता पार्टीने दाखल केली होती

दरम्यान आज समता पार्टीची याचिका फेटाळण्यात आली. यापूर्वीही ही याचिका फेटाळण्यात आली होती. द्विसदस्यीय खंडपीठानेही याचिका फेटाळून लावली आहे. शिवसेना ठाकरे गटाला मशाल हे चिन्हं तात्पुरत्या स्वरूपात दिले गेले आहे. समता पार्टीचं चिन्हं unrecognised झाल्यानंतरच हे चिन्हं देण्यात आलेले आहे. मागील पाच वर्षाचा इतिहास पाहता, समता पार्टीचे उमेदवार निवडून आलेले नाहीत. महाराष्ट्रात समता पार्टीचे फारसे अस्तित्व नाही. हे मुद्दे लक्षात घेऊन त्यांची याचिका फेटाळण्यात आली आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT