Joe Biden News Update|
Joe Biden News Update| Sarkarnama
देश

Joe Biden Murder Plan: सहा महिन्यांपासून..; जो बायडेन यांच्या हत्येचा प्रयत्न करणाऱ्या तरुणाचे धक्कादायक खुलासे...

सरकारनामा ब्यूरो

Truck Collide In White House : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden) यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी युएस पोलिसांनी सोमवारी (२२ मे) एका तरुणाला अटक केली. या प्रकरणी भारतीय वंशाच्या साई वर्षित कंदुला नावाच्या १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली.अटक केलेल्या साई वर्षित कंडुला याची पोलिसांनी चौकशी केली असता त्याने अनेक धक्कादायक विधाने केली आहेत. (Shocking revelations of the young man who tried to kill Joe Biden: For the last six months)

मिळालेल्या माहितीनुसार. गेल्या सहा महिन्यांपासून कंदूलाने हल्ल्याचा प्लॅन करत होता. रात्री आठच्या दरम्यान तो डॅलस आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहचला. त्याने विमानतळाजवळून एक ट्रक भाड्याने घेतला आणि थेट व्हाईट हाऊस जवळ पोहचला. पण त्याच्याजवळ किंवा ट्रकमध्ये शस्त्रे किंवा कोणत्याही प्रकारची स्फोटके सापडली नाहीत. रात्री दहाच्या सुमारास त्याने व्हाईट हाऊसला धडक देण्याचा प्रयत्न केला. यानंतर त्याला पोलिसांनी तात्काळ अटक केली. (Joe Biden News Update)

स्वत:ला नाझी समर्थक असल्याचे सांगत कंदुलाने तिथे जोरदार घोषणाबाजी केली. हिटलरच्या विचारांनी मी खूप प्रभावित असल्याचं त्यानं सांगितलं. कंदुला भेटलेल्यांची ओळख पटवली जात आहे.तो कुठल्यातरी जिहादी गटाच्या संपर्कात असण्याची शक्यताही पोलिसांनी वर्तवली आहे. (America Politics)

विशेष म्हणजे, कंदुलाने 2022 मध्ये मार्चुट सीनियर हायस्कूलमधून शालेय शिक्षण पूर्ण केले आहे. त्याच्या लिंक्डइन प्रोफाईलनुसार, त्याला डेटा अॅनालिटिक्स आणि कोडिंग भाषांमध्ये रस आहे. म्हणजेच त्याला आयटीची आवड असल्याची माहितीही तपासात समोर आली आहे. पण पोलिसांनी अद्याप त्याच्याबद्दल अधिक माहिती सार्वजनिक केलेली नाही.

दरम्यान, तरुणावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden ) यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोपासह त्याच्यावर धोकादायक शस्त्राने हल्ला करणे, मोटार वाहन चालवणे, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना मारणे किंवा अपहरण करणे असे आरोप आहेत. याशिवाय राष्ट्रपतींच्या कुटुंबातील सदस्याला हानी पोहोचवणे, संघीय संपत्ती नष्ट करणे आणि अतिक्रमण केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. (International Politics)

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT