Joe Biden Murder Plan: अमेरिकी राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या हत्येचा प्रयत्न; भारतीय वंशाच्या तरुणाने रचला कट

US White House | या प्रकरणी भारतीय भारतीय वंशाच्या तरुणााला अटक करण्यात आली आहे.
Joe Biden Murder Plan:
Joe Biden Murder Plan:Sarkarnama

Truck Collide In White House : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांच्या हत्येचा कट रचल्याप्रकरणी युएस पोलिसांनी एका तरुणाला अटक केली आहे. या प्रकरणी भारतीय वंशाच्या साई वर्षित कंदुला नावाच्या १९ वर्षीय तरुणाला अटक करण्यात आली आहे.

Joe Biden Murder Plan:
UPSC Result : 'यूपीएससी'त मुलींच्या यशाची गुढी उंच; 'टॉप फोर'मध्ये मारली बाजी !

मिळालेल्या माहितीनुसार, सोमवारी (२३ मे) रात्री व्हाईट हाऊस रस्त्यावरुन जाताना एका तरुणाने ट्रकने व्हाईट हाऊसला टक्कर दिली. या घटनेत कोणालाही दुखापत झाली नाही. यानंतर पोलिसांनी तरुणाला अटक केली. तरुणावर राष्ट्राध्यक्ष जो बायडेन (Joe Biden ) यांना मारण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तसेच, त्याच्यावर धोकादायक शस्त्राने हल्ला करणे, मोटार वाहन चालवणे, राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतींना मारणे किंवा अपहरण करणे असे आरोप आहेत. याशिवाय राष्ट्रपतींच्या कुटुंबातील सदस्याला हानी पोहोचवणे, संघीय संपत्ती नष्ट करणे आणि अतिक्रमण केल्याचा आरोप त्याच्यावर ठेवण्यात आला आहे. (International Politics)

Joe Biden Murder Plan:
Rahul Gandhi News : नवा वाद ; काँग्रेसकडून राहुल गांधींची थेट छत्रपती शिवरायांशी तुलना..? काय आहे प्रकरण?

पोलिस चौकशीतही तरुणाने राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांना हानी पोहोचवायची होती, अशी कबुली दिली आहे. पोलिस अधिकार्‍यांनी दिलेल्या माहितीनुसार, चेस्टरफील्डचा ड्रायव्हर, साई वर्शित कंदुलाने तपासकर्त्यांसमोर धक्कादायक विधाने केली आहेत. अमेरिकेचे अध्यक्ष जो बिडेनला इजा करायची होती. (Crime news)

तरुणाने अपघाताच्या ठिकाणी व्हाईट हाऊसबद्दल चिथावणीखोर घोषणाबाजीही केली. परंतु पोलिसांनी त्याला तात्काळ ताब्यात घेतले. पण त्यांने ज्या ट्रकने व्हाईट हाऊस ला धडक दिली त्या ट्रकमध्ये कोणतीही शस्त्रे किंवा स्फोटके नव्हती. या घटनेत कोणालाही दुखापत किंवा इजा झालेली नाही. या घटनेनंतर वॉशिंग्टन पोलिसांनी ट्रक ताब्यात घेतला आहे.

Edited By- Anuradha Dhawade

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com