siddhanth kapoor News, Bollywood News in Marathi  sarkarnama
देश

मोठी बातमी : श्रद्धा कपूरचा भाऊ सिद्धांत ड्रग्ज प्रकरणात ताब्यात ; ड्रग्ज घेतल्याचे निष्पन्न

बंगळुरूमधील हॉटेलमध्ये पोलिसांनी कारवाई केली. यात सिद्धांतसह सहा जणांना ताब्यात घेतले आहे.

सरकारनामा ब्युरो

बंगळुरू : अभिनेता शक्ती कपूर यांचा मुलगा आणि अभिनेत्री श्रद्धा कपूरचा (shraddha kapoor) भाऊ सिद्धांत (siddhanth kapoor) याला ड्रग्ज (drug) घेतल्याचा आरोपावरुन बंगळुरू पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. अभिनेता शाहरुख खान याचा मुलगा आर्यन याच्यावर ड्रग्जप्रकरणी कारवाई झाल्यानंतर चित्रपटक्षेत्रात एका बड्या अभिनेत्याच्या मुलावर ही कारवाई झाली आहे. (Siddhanth Kapoor latest news)

बंगळुरूमधील एमजी रोडवरील हॉटेलमध्ये सुरू असलेल्या पार्टीवर छापा टाकताना पोलिसांनी कारवाई केली. यात सिद्धांतसह आणखी सहा जणांना ताब्यात घेतले आहे. हे सर्व आरोपी ड्रग्ज टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आढळले असल्याचे पोलिसांनी सांगितले. सिद्धांत सध्या उलसूर पोलिसांच्या ताब्यात असल्याचे बंगळुरू शहर पूर्व विभागाचे डीसीपी डॉ भीमाशंकर एस गुलेद यांनी सांगितले. (Bollywood News in Marathi)

पोलिसांनी अमली पदार्थाच्या सेवनाचा संशय असलेल्या लोकांचे नमुने तपासासाठी पाठवले होते. त्यात तपासणीत पॉझिटिव्ह आढळलेल्या सहा जणांमध्ये सिद्धांतच्या नमुन्याचाही समावेश होता. सिद्धांत कपूरवरील कारवाईनंतर शक्ती कपूर यांची प्रतिक्रिया दिली आहे. एका वेबसाइटशी बोलताना शक्ती कपूर म्हणाले की, "मी फक्त एक गोष्ट सांगू शकतो - हे शक्य नाही".

श्रद्धा कपूरचीही चौकशी

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोने अभिनेता सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणी केलेल्या चौकशीत श्रद्धा कपूरचाही समावेश होता. या प्रकरणात श्रद्धाच्या विरोधात ठोस पुरावे सिद्ध होऊ शकले नाहीत. श्रध्दा कपूर, सारा अली खान आणि दीपिका पदुकोण यांची नावे सप्टेंबर 2020 मध्ये व्हॉट्सअॅप चॅटमध्ये दिसल्यावर त्यांची चौकशी करण्यात आली होती.

  • बॉलिवूड अभिनेता शक्ती कपूरचा सिद्धांत कपूर हा मुलगा आहे.

  • 1997 मध्ये जुडवा या चित्रपटातून त्याने करिअरला सुरुवात केली.

  • अग्ली, जज्बा, हसीना पारकर, पलटन, हॅलो चार्ली आणि चेहरे यांसारख्या चित्रपटांमध्ये सिद्धांतने काम केले आहे.

  • नुकत्याच प्रदर्शित झालेल्या भौकाल या मालिकेतही सिद्धांत दिसला होता.

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT