Shyam Rajak and Lalu Yadav Sarkarnama
देश

Shyam Rajak News : 'मैं शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए...' ; लालूंवर आरोप करत श्याम रजक यांचा 'RJD'ला झटका!

Mayur Ratnaparkhe

Shyam Rajak Letter to Lalu Yadav News : एकीकडे राष्ट्रीय जनता दलाचे राष्ट्रीय अध्यक्ष लालू प्रसाद यादव सिंगापूरमध्ये उपचारासाठी रवाना झाले आणि दुसरीकडे त्यांच्या पक्षाला मोठा झटका बसला. कधीकाळी लालू-राबडी यांच्या नेतृत्वातील बिहार सरकारमध्ये महत्त्वाचे मंत्री राहिलेल्या श्याम रजक यांनी आता RJDला सोडचिठ्ठी दिली आहे. त्यांनी केवळ राजीनामाच दिला नाही, तर लालू प्रसाद यादव यांना शायराना अंदाजात टोमणाही मारला आहे.

खरंतर श्याम रजक(Shyam Rajak) हे या आधीही राष्ट्रीय जनता दलास सोडचिठ्ठी देवून मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्या जनता दल यूनायटेडमध्ये सहभागी झाले होते. यंदाही अशीच परिस्थिती दिसत आहे, मात्र त्यांनी अद्याप अधिकृतपणे याबाबतची घोषणा केलेली नाही.

जाणून घ्या, काय म्हटले आहे पत्रात? -

श्याम रजक यांनी लालू प्रसाद यादव(Lalu Yadav) यांना पत्र लिहून म्हटले आहे की, मी राष्ट्रीय जनता दलाच्या राष्ट्रीय सरचिटणीस आणि पक्षाच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत आहे. श्याम रजक यांनी शेवटी खास शायराना अंदाजात आपली तक्रार मांडत लालू प्रसाद यांच्यावर धोखा दिल्याचा आरोपही केला आहे. त्यांनी म्हटले की, ''मैं शतरंज का शौकीन नहीं था, इसलिए धोखा खा गया। आप मोहरे चल रहे थे, मैं रिश्तेदारी निभा रहा था..''

नेमकं कशामुळे श्याम रजक होते नाराज? -

असं बोललं जात आहे की, राज्यसभेवर पाठवलं न गेल्यामुळे श्याम रजक नाराज होते. त्यांच्यानुसार राष्ट्रीय जनता दलाने मनोज झा यांना दुसऱ्यांदा राज्यसभेवर पाठवलं आहे. तेच श्याम रजक यांची जात धोबी समाजातून मुन्नी रजक यांना विधान परिषदेवर पाठवलं गेलं. राजकीय अभ्यासक हेहे म्हणत आहेत की श्याम रजक यांचे विधानसभा क्षेत्र फुलवारी शरीफ आहे. त्यामुळे आता ते पुन्हा एकदा जनता दल यूनायटेडमध्ये प्रवेश करून फुलवारी मतदारसंघातून निवडणूक लढवू शकतात. प्राप्त माहितीनुसार काही दिवसांपूर्वीच श्याम रजक यांनी मुख्यमंत्री नितीश कुमारांची(NitishKumar) भेटही घेतली होती.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT