Loksabha Election 2024 : रोहिणी आचार्यांमुळे लालू यादव यांची प्रतिष्ठा पणाला

Rohini Acharya १९७७ मध्ये लालूप्रसाद यादव यांनी छपरा मधून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर मधेपुरामध्येही लालू जिंकले असले तरी सुरक्षेचा उपाय म्हणून लालूंना पुन्हा छपरा मतदारसंघाची वाट धरावी लागली. यावेळी त्यांनी कन्या रोहिणी आचार्य यांना सारण मधून निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे.
Lalu Yadav, Rohini Acharya
Lalu Yadav, Rohini Acharyasarkarnama

Bihar Loksabha News : सोनपूर यात्रेमुळे प्रसिद्ध असलेल्या बिहारच्या सारण लोकसभा मतदारसंघामध्ये राष्ट्रीय जनता दलाच्या उमेदवार रोहिणी आचार्य यांच्यामुळे लालूप्रसाद यादव यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. भाजपचे विद्यमान खासदार राजीव प्रताप रुडी यांची आणि रोहिणी आचार्य यांच्या दुरंगी लढतीमध्ये येथील जातकेंद्रीत राजकारणातील राजपूत विरुद्ध यादव हा संघर्ष निर्णायक ठरणार आहे.

लालूप्रसाद यादव यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरवातही याच भागातून झाली होती. हा पूर्वाश्रमीचा छपरा लोकसभा मतदारसंघ होता. २००८ मध्ये सारण मतदारसंघ असे नामकरण झाले. १९७७ मध्ये लालूप्रसाद यादव यांनी छपरा मधून निवडणूक जिंकली होती. त्यानंतर मधेपुरामध्येही लालू जिंकले असले तरी सुरक्षेचा उपाय म्हणून लालूंना पुन्हा छपरा मतदार संघाची वाट धरावी लागली होती.

यावेळी त्यांनी कन्या रोहिणी आचार्य यांना सारण मधून निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. दुसरीकडे, भाजपचे नेते आणि या भागातील प्रमुख राजपूत चेहरा म्हणून ओळखले जाणारे राजीव प्रताप रुडी हे देखील छपरामध्ये १९९६, १९९९ मध्ये जिंकले होते. त्यानंतर २०१४ पासून ते लोकसभेत सारणचे प्रतिनिधित्व करत आहेत. सारणमध्ये यादव आणि राजपूत समुदायाची तुल्यबळ लोकसंख्या लक्षात घेता निवडणूक नेहमीच जातकेंद्रीत होत आली आहे.

Lalu Yadav, Rohini Acharya
Bihar JDU News: बिहारमधील 'या' शक्तिशाली नेत्यांच्या पत्नी निवडणुकीच्या रिंगणात...

साहजिकच आताही सारणमध्ये विकासाचा मुद्दा चर्चेत असला तरी राजपूत विरुद्ध यादव अशी येथील लढतीची वाटचाल सुरू झाली आहे. लालूंच्या आजारपणाच्या काळात रोहिणी आचार्य यांनी आपले मुत्रपिंड दिले होते. त्या भावनिक मुद्द्यावरही रोहिणी आचार्य प्रचार करत आहेत. दोन दिवसांपूर्वी रोहिणी आचार्य यांचा उमेदवारी अर्ज भरताना लालू यादव, राबडी देवी, तेजस्वी यादव असे सहकुटुंब शक्तीप्रदर्शन करण्यात आले होते. मात्र, येथील निवडणूक लालू केंद्रीत असल्याने भाजपकडून लालूंच्या सत्ताकाळातील जंगलराजचा मुद्दा उपस्थित केला जात आहे.

त्यापार्श्वभूमीवर, सोनपूरच्या ज्या हरिहर मंदिरातील पुजेतून लालू, रोहिणी यादव यांनी प्रचाराला प्रारंभ केला, तेथील पुजारी भरत पंडा यांनी सारणच्या लढतीबद्दलची प्रतिक्रिया सूचक होती. इथे कोण निवडणूक लढतात हे सर्वांना माहिती आहे. परंतु सुरक्षा ही सर्वांसाठीच महत्त्वाची असते, अशी टिप्पणीही त्यांनी केली. तर सरकारी नोकरीतून निवृत्त झालेले दिनेशचंद्र यादव यांनी सारणमधले चौपदरी रस्ते, उड्डाणपूल यासारखी विकासकामे लालूंनी केली त्यांचा वापर फक्त यादव मंडळीच करतात काय, असा उपरोधिक सवाल केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

Lalu Yadav, Rohini Acharya
Lalu Prasad Yadav : लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर लालू प्रसाद यादवांना धक्का! राष्ट्रीय उपाध्यक्षांनी सोडला पक्ष

तसेच इथे राष्ट्रीय जनता दलाचे निवडणूक चिन्ह कंदिलच (लालटेन) पेटणार, असा छातीठोक दावा केला. मात्र, राजकीय निरिक्षकाच्या मते येथील एक महत्त्वाचा घटक लालूकन्या रोहिणी आचार्य यांनात त्रासदायक ठरू शकतो. तो म्हणजे, लालू यांचे पुत्र तेजप्रताप यादव यांचे श्वशूर राहिलेले चंद्रिका राय. बिहारचे माजी मुख्यमंत्री राहिलेल्या दरोगाप्रसाद राय यांच्या कुटुंबातील चंद्रिका राय यांच्या कन्या ऐश्वर्या यांच्याशी तेजप्रताप यादव यांचा विवाह झाला होता.

परंतु, तेजप्रताप यादव आणि ऐश्वर्या विभक्त होणार असल्याच्या चर्चांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही कुटुंबांमध्ये दुरावा वाढल्यानंतर चंद्रिका राय हे नितीशकुमार यांच्या संयुक्त जनता दलामध्ये गेले. त्यांची विरोधाची भूमिका देखील लोकसभा निवडणुकीत रोहिणी आचार्य यांच्यासाठी पर्यायाने लालूंसाठी देखील त्रासदायक ठरण्याची भीती आहे.

Edited By : Umesh Bambare

Lalu Yadav, Rohini Acharya
Rohini Acharya : नितीशकुमारांना भिडणारी लालूंची लेक; राजकारणात येण्याची तयारी

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com