Karnataka CM politics : कर्नाटकमध्ये गुरूवारी मोठी राजकीय घडामोड घडली. राज्याचे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री राहिलेले सिध्दरामय्या आज पदावरून पायउतार झाले. त्यांनी मुख्यमंत्रिपद सोडावे, यासाठी मागील काही महिन्यांपासून काँग्रेस नेत्यांकडून मनधरणी सुरू होती. अखेर ते राजीनामा द्यायला तयार झाले. पण त्यासाठी त्यांना पक्षश्रेष्ठींनी काही ऑफर दिल्याचीही चर्चा होती.
सिध्दरामय्या यांनी लोकभवनात जाऊन राज्यपालांच्या सचिवांकडे आपला राजीनामा सोपविला. राज्यपाल राज्यात नसल्याने ते परतल्यानंतर मुख्यमंत्र्यांचा राजीनामा स्वीकारतील. त्यानंतरच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांचा मुख्यमंत्रिपदाचा मार्ग मोकळा होईल. या घडामोडी घडत असतानाच सिध्दरामय्या यांनी आपण राज्याच्या राजकारणातच सक्रीय राहणार असल्याचे जाहीर केले.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी सिध्दरामय्या यांना राज्यसभेवर पाठविण्याची ऑफर दिली होती. तसेच मुलाला उपमुख्यमंत्रिपद देण्याचे आश्वासन त्यांना मिळाले होते. राज्यसभेच्या ऑफरबाबत सिध्दरामय्या यांनी आज कबुली देताना आपल्याला ही ऑफर अमान्य असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. दिल्लीच्या राजकारणात आपल्याला रस नल्याचे संकेत देतानाच त्यांनी अखेरच्या श्वासापर्यंत कर्नाटकाच्या राजकारणातच राहणार असल्याचे ठामपणे सांगितले.
दरम्यान, नेतृत्वबदलामुळे पक्षांत वाद निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. त्यावरही सिध्दरामय्या यांनी सूचक विधान केले. ते म्हणाले, आपल्याला एक कुटुंब म्हणून सोबत राहायला हवे, असे मी मानतो. माझ्या मुख्यमंत्रिपदाच्या कार्यकाळात मी सर्वांना समान वागणूक देण्याचा प्रयत्न केला. कर्नाटक काँग्रेस एका कुटुंबाप्रमाणे एकजुट राहील, असा विश्वासही सिध्दरामय्या यांनी व्यक्त केला.
सिध्दरामय्या यांचा हा संदेश काँग्रेसला उभारी देणारा आहे. मागील अनेक वर्षांपासून राज्यात सिध्दरामय्या विरूध्द शिवकुमार असे दोन गट उघडपणे सक्रीय आहेत. मात्र, या दोन्ही नेत्यांनी त्याचा थेट फटका पक्षाला बसू नये, याची नेहमीच काळजी घेतल्याचे आतापर्यंतच्या त्यांच्या राजकीय निर्णयातून दिसून आले आहे. मागील काही महिन्यांत शिवकुमार यांनी दाखविलेला संयम, हे त्याचे प्रतिक आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.