Karnataka CM news : नाश्ता करता करताच सिध्दरामय्यांनी नेत्यांसमोर टाकला बॉम्ब; थेट राजीनाम्याची घोषणा, मंत्र्यांनी पायच धरले...

Siddaramaiah resignation rumours, DK Shivakumar new CM : मंत्री ए. के. पाटील यांनी नाश्त्याच्या टेबलवर झालेल्या चर्चेची माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री दुपारी तीन वाजता राजीनामा देणार आहे.
Political circles in Karnataka witnessed intense speculation after remarks linked to Siddaramaiah and D. K. Shivakumar surfaced following a breakfast meeting in Bengaluru.
Political circles in Karnataka witnessed intense speculation after remarks linked to Siddaramaiah and D. K. Shivakumar surfaced following a breakfast meeting in Bengaluru.Sarkarnama
Published on
Updated on

Congress politics : कर्नाटकात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या नेतृत्वबदलाच्या चर्चांवर आज अखेर पडदा पडला आहे. दोन दिवसांपूर्वी दिल्लीत झालेल्या मॅरेथॉन बैठकांमध्ये मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांचे मन वळविण्यात काँग्रेस नेतृत्वाला यश आल्याचे गुरूवारी स्पष्ट झाले आहे. मागील दोन दिवस राज्याच्या राजकारणात मोठा सस्पेन्स निर्माण झाला होता. अखेर मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी आपण राजीनामा देणार असल्याचे मंत्र्यांसमोरच जाहीर केले.

दिल्लीहून परतल्यानंतर सिध्दरामय्या यांनी आपल्या कॅबिनेटमधील सर्व सहकाऱ्यांना गुरूवारी सकाळी त्यांच्या शासकीय निवासस्थानी नाश्त्यासाठी बोलावले होते. मागील अनेक दिवसांपासून सिध्दरामय्यांकडून 'ब्रेकफास्ट डिप्लोमसी'चा अवलंब केला जात आहे. आज कॅबिनेटसोबत त्यांनी अखेरचा नाश्ता केला. नाश्ता करता करताच त्यांनी आपण मुख्यमंत्रि‍पदाचा राजीनामा देणार असल्याचे सांगितले. तसेच उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार हे नवे मुख्यमंत्री असतील, असा प्रस्ताव त्यांनी सर्वांसमोर ठेवला.

बैठकीमध्ये शिवकुमार हे सिध्दरामय्या यांच्या पाया पडल्याचे फोटो समोर आले आहेत. दोघांनी गळाभेट घेत एकमेकांना शुभेच्छाही दिल्या. दरम्यान, मंत्री ए. के. पाटील यांनी नाश्त्याच्या टेबलवर झालेल्या चर्चेची माहिती देताना सांगितले की, मुख्यमंत्री दुपारी तीन वाजता राजीनामा देणार आहे. मुख्यमंत्री सिध्दरामय्या यांनी डी. के. शिवकुमार हे नवे मुख्यमंत्री असतील, असे सांगितले. त्यानुसार आता शिवकुमार हे पुढील मुख्यमंत्री असतील, असे सांगत पाटील यांनी मुख्यमंत्रि‍पदाचा सस्पेन्स संपविला आहे.

Political circles in Karnataka witnessed intense speculation after remarks linked to Siddaramaiah and D. K. Shivakumar surfaced following a breakfast meeting in Bengaluru.
Rahul Gandhi news : राहुल गांधींकडून 'करेक्ट कार्यक्रम'; 'त्या' नेत्यांना दाखवून दिली ताकद

कर्नाटकात काँग्रेसची सत्ता आल्यानंतर पहिल्या दिवसापासूनच शिवकुमार हे मुख्यमंत्रि‍पदासाठी उत्सुक होते. मात्र, सुरूवातीला पक्षाने सिध्दरामय्यांवर विश्वास दाखविला. सरकारला अडीच वर्षे पूर्ण होताच शिवकुमार यांच्या समर्थक आमदारांनी डोकं वर काढलं. सुरूवातीलाच अडीच वर्षांचा फॉर्म्यूला ठरला होता, त्यानुसार शिवकुमार यांना मुख्यमंत्री करावे, या मागणीने जोर धरला होता. मागील काही महिन्यांपासून त्याची राज्याच्या राजकारणात जोरदार चर्चा सुरू होती.

Political circles in Karnataka witnessed intense speculation after remarks linked to Siddaramaiah and D. K. Shivakumar surfaced following a breakfast meeting in Bengaluru.
Raj Thackeray News : सावरकरांनी हिंदू धर्मातील त्रुटींवर टीका करताना कधी मागेपुढे पाहिलं नाही..! राज ठाकरेंनी सत्ताधारी पक्षांना झोडपले

अखेर मागील दोन दिवसांपूर्वी दिल्लीत सिध्दरामय्या आणि शिवकुमार यांच्यासोबत राहुल गांधी, मल्लिकार्जून खर्गे यांच्या बैठका झाल्या. राहुल गांधी स्वत: दोघांशीही वैयक्तिकरीत्या बोलले. त्यानंतर यावर तोडगा निघाल्याचे सांगितले जात आहे. या भेटीनंतरच सिध्दरामय्या यांनी पायउतार होण्याचे मान्य केल्याचे समजते. सिध्दरामय्या यांना राज्यसभेत पाठवून दिल्लीत पक्षाची मोठी जबाबदारी दिली जाणार असल्याचीही चर्चा आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com