Siddaramaiah, Dk Shivkumar News
Siddaramaiah, Dk Shivkumar News Sarkarnama
देश

Karnataka Politics : 'कर्नाटकमध्ये सिद्धरामय्याच पाच वर्ष मुख्यमंत्री राहणार; अडीच-अडीच वर्षांचा कोणताही फॉर्म्युला नाही'

सरकारनामा ब्यूरो

Karnataka CM Siddaramaiah News : सिद्धरामय्या हे पाच वर्षांसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री असतील. राज्यात अडीच-अडीच वर्षांच्या सत्तेचा कोणताही फॉर्म्युला नाही, अशी माहिती कर्नाटकचे मंत्री एम. बी. पाटील यांनी सांगितले.

पाटील म्हणाले ''जर असा प्रस्ताव असेल तर पक्षाचे हायकमांड आणि सरचिटणीस केसी वेणुगोपाल यांनी राज्य युनिटला त्याबद्दल माहिती दिली असती. कर्नाटक विधानसभा निवडणुकीचा निकाल 13 मे रोजी जाहीर झाला. 224 जागांपैकी काँग्रेसने (congress) 135, भाजपने (BJP) 66 आणि जेडीएसने 19 जागा जिंकल्या.

निकाल आल्यानंतर मुख्यमंत्री पदाबाबत काँग्रेसमध्ये पाच दिवस मंथन सुरूच होते. सिद्धरामय्या (Siddaramaiah) आणि डी. के. शिवकुमार यांच्यात मुख्यमंत्रीपदासाठी स्पर्धा होती. हायकमांडने सिद्धरामय्या यांची निवड केली. तर डी. के. यांना उपमुख्यमंत्री पद देण्यात आले.

कर्नाटकच्या (Karnataka) मुख्यमंत्री पदाचा तिढा निर्माण झाला होता, तेव्हा सिद्धरामय्या आणि डी. के. शिवकुमार यांना अडीच-अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद देण्यात येईल, अशी चर्चा होती. मात्र, असा कोणताही निर्णय झाला नसल्याचे पाटील यांनी सांगितले आहे. त्यामुळे कर्नाटकमध्ये पुन्हा एकदा मुख्यमंत्री पदाचा संघर्ष निर्माण होणार का? अशी चर्चा सुरु झाली आहे.

दरम्यान, कर्नाटमध्ये सिद्धरामय्या यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच डी. के. शिवकुमार यांनी उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तर त्यांच्यासोबत 8 आमदारांनी कॅबिनेट मंत्रिपदाची शपथ घेतली. आठ आमदारांमध्ये काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा मुलगा प्रियांक खर्गे, पक्षाचे आमदार जी परमेश्वरा आणि एमबी पाटील यांचा समावेश आहे. शपथ घेतलेल्या इतर आमदारांमध्ये केएच मुनियप्पा, केजे जॉर्ज, सतीश जारकीहोळी, रामलिंगा रेड्डी आणि जमीर अहमद खान यांचा समावेश आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT