Prashant Kishor News : मी बोलतोय ते लिहून ठेवा; नितीश कुमारांबद्दल प्रशांत किशोरांनी केली भविष्यबाणी : चंद्राबाबू नायडूंसारखी अवस्था होईल...

Prashant Kishor, Nitish Kumar News : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या विरोधकांना एकत्र करण्यासाठी विविध नेत्यांचे भेटी घेत आहेत.
Prashant Kishor, Nitish Kumar News
Prashant Kishor, Nitish Kumar NewsSarkarnama

Nitish Kumar News : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार सध्या विरोधकांना एकत्र करण्यासाठी विविध नेत्यांचे भेटी घेत आहेत. यावरुन राजकीय रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी नितीश कुमार यांच्यावर टीका केली आहे. नितीश कुमारांची अवस्था ही आंध्र प्रदेशच्या चंद्राबाबू नायडूंसारखी होणार असल्याचे प्रशांत किशोर म्हणाले आहेत.

प्रशांत किशोर म्हणाले, नितीश कुमार (Nitish Kumar) सध्या जी भूमिका निभावण्याचा प्रयत्न करत आहेत, अशीच भूमिका पाच वर्षांपूर्वी आंध्र प्रदेशचे चंद्राबाबू नायडू यांची होती. मात्र, नायडू हे किमान आंध्र प्रदेशात बहुमतातले सरकार तरी चालवत होते. नितीश कुमार तर फक्त ४२ आमदार असलेला राज्यातला तिसऱ्या क्रमाकांचा पक्ष चालवत आहेत.

Prashant Kishor, Nitish Kumar News
Pune Loksabha By Election : मोठी बातमी! पुणे लोकसभा पोटनिवडणूक कुठल्याही क्षणी जाहीर होण्याची शक्यता; 'हे' आहे कारण

सध्या ते बिहारमध्ये लंगडे सरकार चालवत आहेत. निवडणुकीनंतर चंद्राबाबू नायडूंच्या (Chandrababu Naidu) रणनीतींचे काय झाले ते आपण सर्वांनी पाहिले आहे, असा टोला प्रशांत किशोर यांनी लगावला आहे. प्रशांत किशोर म्हणाले की, चंद्राबाबू नायडूदेखील देशातल्या वेगवेगळ्या राज्यांचा दौरा करून विरोधी पक्षांना एकत्र करण्याचा प्रयत्नात करत होते.

मात्र, आंध्र प्रदेशात त्यांच्या पायाखालची जमीन सरकली. निवडणुकीच्या निकालानंतर ते शांत झाले आहेत. त्यांच्या पक्षाचे केवळ तीन खासदार निवडून आले. आता त्यांच्याकडे २३ आमदार आहेत. बहुमतातले सरकार चालवणारे नायडू सत्तेतून बाहेर फेकले गेले आहेत. त्यामुळे तुम्ही लिहून घ्या, नितीश कुमार यांच्यावसुद्धा तशीच परिस्थिती येणार असल्याचे प्रशांत किशोर (Prashant Kishor) म्हणाले.

Prashant Kishor, Nitish Kumar News
Rahul Gandhi News: उच्च न्यायालयाचा राहुल गांधींना दणका; दिलासा देणारा 'तो' निर्णय मागे

नितीश कुमार यांनी बिहारची काळजी करायला हवी. तिकडे त्यांचे स्वतःचे काही अस्तित्व नाही. हे निघालेत विरोधकांना एकत्र करायला, असेही किशोर म्हणाले आहेत. प्रशांत किशोर यांनी राजदवरही यावेळी टीका केली. ज्या पक्षाकडे साधा एक खासदार नाही, तो पक्ष देशाचा पंतप्रधान कोण होणार ते ठरवण्याचा प्रयत्न करत आहे, अशा शब्दांत त्यांनी टीका केली.

नितीश कुमार आणि ममता बॅनर्जी यांच्या भेटीवरदेखील किशोर यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नितीश कुमार पश्चिम बंगालला गेले होते. त्यांनी आता सांगावे की, ममता बॅनर्जी काँग्रेसबरोबर काम करायला तयार आहेत का? बिहारमध्ये लालू प्रसाद यादव व स्वतः नितीश कुमार मता बॅनर्जी यांना एक जागा तरी देतील का? मी नितीश कुमारांपेक्षा ममता बॅनर्जींना चांगले ओळखतो. बंगालमध्ये नितीश कुमार यांना किंमत नसल्याचाही हल्लाबोल त्यांनी केला.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Sarkarnama News
sarkarnama.esakal.com