Navjot Singh Sidhu | Navjot Singh Sidhu News | AAP News | Punjab election results 2022 live updates
Navjot Singh Sidhu | Navjot Singh Sidhu News | AAP News | Punjab election results 2022 live updates  Sarkarnama
देश

AAP च्या पंजाब विजयाने सिद्धूची विकेट! प्रदेशाध्यक्ष पदाचा दिला राजीनामा...

सरकारनामा ब्यूरो

नवी दिल्ली : पंजाबमध्ये मोठी उलथापालथ झाली असून आम आदमी पक्षाने मोठा विजय मिळवला आहे. सत्तेत असलेल्या काँग्रेसला पछाडत सत्तेचे सुत्र आपल्या हाती घेतील, असे जवळपास निश्चित झाले आहे. दरम्यान पंजाबचे माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांचाही पराभव झाला असून दोन जागेवरून निवडणूक लढत असलेले मुख्यमंत्री चरणजीत सिंह चन्नी आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नवज्योतसिंग सिद्धू हेही पराभवाच्या छायेत आहेत. दरम्यान सिद्दूने आपला पराभव मान्य करत आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले. तर, आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामाही दिला आहे. आपच्या पंजाब विजयाने मुख्यमंत्री होण्याची महत्वकांक्षा असलेल्या सिद्धूंना प्रदेशाध्यक्ष पदही गमवावे लागले असून ते आमदारही होतील का नाही याबाबत चिंता व्यक्त केली जात आहे. (Punjab election results 2022 live updates)

पंजाब मधील निकाल हे एक्झिट पोल (Exit Poll) नुसारच दिसत असून आपने (AAP) पंजाबमध्ये जोरदार मुंसडी मारत सत्तेच्या जवळ पोचली आहे. पंजाबमधील 117 जागापौकी 90 जांगावर आपने आघाडी घेतली असून सत्तेत असलेल्या काँग्रेसला (Congress) 14 जागांवर आघाडी मिळाली आहे. तर शिरोमणी आकाली दलाला 10 तर भाजपने 3 जागेवर आघाडी घेतल्याचे हे चित्र बघायला मिळत आहे. आपच्या झाडूने सत्तेत असलेल्या काँग्रेसला पछाडत सत्तेचे सुत्र आपल्या हाती घेतील, असे जवळपास निश्चित झाले आहे. (Navjot Singh Sidhu News)

दरम्यान, पंजाबमध्ये दिग्गजांना मोठा झटका बसला असून माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंग यांना पराभवाचा सामना करावा लागला असून पंजाब काँग्रेसचा महत्वाचा चेहरा असलेले नवज्योतसिंग सिद्धू, माजी मुख्यमंत्री चरनजीत चेन्नी यांना आपच्या उमेदवारांनी घाम फोडला असून ते पिछाडीवर असून पराभवाच्या छायेत आहेत. सिद्धूने जनतेच्या कौलाचा सन्मान कपत पंजाबमधील काँग्रेसचा पराभव मान्य केला असून आम आदमी पक्षाचे अभिनंदन केले आहे. पराभवाची जबाबदारी स्विकारत आपल्या प्रदेशाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT