New Delhi : उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना गुरू मानणारे प्रसिध्द भजन गायक कन्हैया मित्तल यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. आपण कोणत्याही पक्षात असलो तरी योगीचं आपले गुरू असतील, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.
कन्हैया मित्तल हे हरियाणातील पंचकुला विधानसभा मतदारसंघातून भाजपच्या तिकीटासाठी आग्रही होते, अशी चर्चा होती. पण या मतदारसंघातून भाजपने ज्ञानचंद यांनाच उमेदवारी दिली. त्यानंतर मित्तल यांनी काँग्रेसमध्य प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचे तर्कवितर्क लढवले जात आहेत.
कन्हैया मित्तल यांनी मात्र उमेदवारीच्या चर्चा फेटाळून लावल्या आहेत. आपल्या उमेदवारी हवी असती तर ती कशीही मिळवली असते, असे त्यांनी स्पष्ट केले आहे. त्यांनी 2022 मध्ये यूपी विधानसभेच्या निवडणुकीत जो ‘राम को लाई हैं, हम उनको लाएंगे’ हे गीत योगींसाठी गायले होते. निवडणुकीत हे गाणे खूप गाजले होते. त्यानंतर योगी आणि मित्तल यांच्यामधील नाते घट्ट बनत गेले.
मित्तल यांनी यापूर्वी अनेकदा योगींसह पंतप्रधान नरेंद्र मोदींचे सार्वजनिक मंचावर कौतुक केले आहे. त्यामुळे ते भाजपशी जोडले गेल्याची चर्चा होती. पण त्यांनी अचानक काँग्रेसमध्ये जाण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त केले जात आहे.
याविषयी मित्तल यांनीच खुलासा केला आहे. ते म्हणाले, ‘सनातन’वर केवळ एकाच पक्षाने बोलू नये, सर्वच पक्षांनी त्यावर बोलावे, असे मला वाटते. त्यामुळेच काँग्रेसमध्ये जाण्याची इच्छा झाली. भाजपशी माझे कसलेही वैर नाही. मी कधीही भाजपचा प्रचार केला नाही. तिकीट हे माझ्यासाठी मोठी गोष्ट नाही. काही लोकांशी बोलून तिकीट मिळवले असते, असेही मित्तल यांनी स्पष्ट केले.
मी कधीही भाजपसाठी मते मागितली नाही. जे राम मंदिरासाठी काम करतील, सनातनसाठी काम करतील, त्यांना मदत करा, असे मी म्हटले. हे काम आपण कुठूनही करू शकतो. एकाच पक्षात राहून तपस्या करावी, हे आवश्यक नसल्याचे मित्तल यांनी सांगितले.
मी कधीही भाजपमध्ये नव्हतो. पण रामाचे भजन गाण्यासाठी मला बोलवाले जायचे. या भजनातही भाजपचा उल्लेख नाही. आमच गुरू योगी आदित्यनाथ त्यांच्यासाठी हे भजन गायले. मी कोणत्याही पक्षात गेलो तरी ते आजही आमचे गुरू आहेत, उद्याही राहतील. त्यात काहीही फरक पडणार नाही, असे मित्तल यांनी ठामपणे सांगितले.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.