Mamata Banerjee : ममतांना पहिला मोठा धक्का; खासदाराचा तडकाफडकी राजीनामा, राजकारणातूनही घेतला संन्यास

Kolkata Rape-Murder Case Jawahar Sircar TMC : कोलकाता रेप-मर्डर प्रकरणाने ममता बॅनर्जी यांची डोकेदुखी वाढतच चालली आहे. आता पक्षातूनच त्यांना विरोध होऊ लागला आहे.
Jawhar Sircar, Mamata Banerjee
Jawhar Sircar, Mamata BanerjeeSarkarnama
Published on
Updated on

Kolkata : कोलकाता येथील आरजी कर रुग्णालयात ट्रेनी महिला डॉक्टरवर झालेल्या बलात्कार आणि हत्येच्या घटनेने मुख्यमंत्री ममता बॅनर्जी चक्रव्युहात अडकल्या आहेत. राज्यातील नागरिकांमध्ये या घटनेवरून सरकारविरोधात नाराजी वाढत असतानाच आता पक्षाती धुसफूसही समोर आली आहे.

कोलकाता रेप घटनेवरून खासदार जवाहर सरकार यांनी रविवारी पदाचा तडकाफडकी राजीनामा दिला. एवढेच नाही तर त्यांनी राजकारणातून संन्यास घेत असल्याचेही जाहीर केले आहे. राजीनामा देताना त्यांनी थेट ममतांवर निशाणा साधला आहे. तसे पत्रच त्यांनी ममतांना लिहिले आहे. घटनेच्या विरोधात पक्षातून हा पहिला राजीनामा आल्याने ममतांसाठी मोठा धक्का मानला जात आहे.

Jawhar Sircar, Mamata Banerjee
Vinesh Phogat : 15 वर्षांपासून ‘या’ मतदारसंघात उमेदवाराचा पराभव, काँग्रेसनं विनेशवरच डाव उलटवला?

सरकार हे राज्यसभेचे खासदार आहेत. त्यांनी पत्रात म्हटले आहे की, रेप-मर्डर प्रकरणामध्ये तातडीने कडक कारवाई होईल, अशी अपेक्षा होती. पूर्वीच्या ममता बॅनर्जींप्रमाणे कारवाई होईल, असे वाटत होते. पण लगेच कोणतेही ठोस पाऊल उचलले गेले नाही. निर्णय घेतला, पण त्याला उशिरा झाला होता, अशी नाराजी सरकार यांनी व्यक्त केली आहे. लवकरच राज्यसभा सभापतींकडे राजीनामा सादर करणार असून राजकारणातूनही संन्यास घेत असल्याचे त्यांनी पत्रात म्हटले आहे.

राज्यात लवकरात लवकर शांतता निर्माण व्हावी आणि दोषींना कडक शिक्षा व्हायला हवी, अशी अपेक्षाही सरकार यांनी व्यक्त केली आहे. घटनेमुळे मी खूप निराश आहे. आंदोलन करणाऱ्या डॉक्टरांसोबत ममता पूर्वीप्रमाणे थेट संवाद साधतील, अशी अपेक्षा होती. बंगालला आंदोलनांनी अशांत केले आहे. ते टीएमपी सरकारमधील काही आवडते आणि भ्रष्ट लोकांच्या अनियंत्रित दबंग भूमिकेविरोधाचे प्रतिबिंब असल्याची टीकाही सरकार यांनी केली आहे.

Jawhar Sircar, Mamata Banerjee
Jammu Kashmir Elections: जम्मू काश्मीरमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कुठल्या पक्षाचा? सरासरी संपत्ती तीन कोटी

सरकार यांनी पक्षातील भ्रष्टाचाराचाही मुद्दा उपस्थित केला आहे. पंचायत आणि नगरपालिकांमध्ये स्थानिक स्तरावर पक्षाच्या अनेक नेत्यांनी प्रचंड संपत्ती गोळा केली आहे. त्यामुळे बंगालच्या लोकांचे नुकसान झाले आहे. इतर पक्षांतील नेत्यांचीही तीच स्थिती आहे. अशाप्रकारचा भ्रष्टाचार आणि वर्चस्व बंगाल स्वीकारू शकत नाही, असा हल्ला सरकार यांनी चढवला आहे.

सरकार यांच्या राजीनाम्यानंतर भाजपनेही ममतांवर निशाणा साधला आहे. भाजपच्या आयटी सेलचे प्रमुख अमित मालवीय म्हणाले, टीएमसी सरकारमधील भ्रष्टाचार आणि बलात्कार-हत्येचे प्रकरण चांगल्याप्रकारे न हाताळल्याने जवाहर सरकार यांनी राजीनामा दिला आहे. आता ममतांनीही पद सोडण्याची वेळ आली आहे. त्यांनी पोलिस आयुक्तांसोबत एकत्रित येत पुरावे नष्ट केल्याचा आरोपही मालवीय यांनी केला आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com