Sidhu Moose Wala
Sidhu Moose Wala  Sarkarnama
देश

गायक सिद्धू मूसेवालाला साश्रूनयनाने निरोप; उसळला हजारोंचा जनसागर

सरकारनामा ब्युरो

नवी दिल्ली : काँग्रेस (Congress) नेता व प्रसिद्ध पंजाबी गायक सिद्धू मूसेवाला (Sidhu Moose Wala) याला अखेरचा निरोप देण्यात आला. या वेळी हजारोंच्या संख्येने जमलेल्या चाहत्यांना अश्रू अनावर झाले. मानसा जिल्ह्यातील मूसा गावात शेतामध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. सिद्धूच्या अंत्ययात्रेत चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती. मूसेवाला यांचे वडील बलकोर सिंग आणि आई चरण कौर यांनी आपल्या गायक पुत्राला निरोप देण्यासाठी आलेल्या हजारो चाहत्यांना अभिवादन केले. (Sidhu Moose Wala News Updates)

अंत्ययात्रेत आणि अंत्यसंस्काराच्या ठिकाणी पंजाब सरकारच्या विरोधात संताप व्यक्त करण्यात आला. तसेच, सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. सिद्धूची सुरक्षा काढून घेणे आणि त्याची माहिती सार्वजनिक केल्याबद्दल सरकारबाबत रोष व्यक्त करण्यात आला. तत्पूर्वी मानसा सरकारी रुग्णालयात सिद्धूचे शवविच्छेदन करण्याचे आले. आज सकाळी त्याचे पार्थिव कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आले.

पगडी काढून वडिलांनी दु:ख केलं प्रदर्शित

अंत्ययात्रेत सिद्धूच्या वडिलांनी आपली पगडी काढून आपला पुत्र हिरावला गेल्याचं दु:ख मूकपणे व्यक्त केल्याने उपस्थितांना हुंदका आवरता आला नाही.सिद्धूच्या आई-वडिलांची ढासळलेली मनःस्थिती पाहून लोकांचे मन हेलावले. दरम्यान, त्यावेळी अंत्यदर्शनासाठी चाहत्यांची मोठी गर्दी उसळली होती. याचबरोबर कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.

पुढील महिन्यात होणार होता विवाह

सिद्धची अंत्ययात्रा त्याच्या आवडीच्या ५९११ ट्रॅक्टरवर काढण्यात आली. सिद्धूने अनेक पंजाबी गीतात याच ट्रॅक्टरचा उल्लेख केला होता. या ट्रॅक्टरमध्ये अनेक बदल करून त्याने तो घरातच ठेवला होते. सिद्धूचा ११ जूनला २९ वा वाढदिवस होता. याचबरोबर जून महिन्यांतच त्याचा विवाह होणार होता. पण त्याआधीच त्याची हत्या झालानं कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळलाय

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT