Kerala SIR: बिहारनंतर आता दुसऱ्या टप्प्यात देशातील १२ राज्यांमध्ये मतदार याद्यांचं स्पेशल इन्टेन्सिव्ह रिव्हिजन (SIR) प्रक्रिया सुरु होणार आहे. यामध्ये केरळ राज्याचाही समावेश आहे. केरळमध्ये सरकारसह विरोधकांनीही या प्रक्रियेला विरोध दर्शवला आहे. निवडणूक आयोगाच्या या SIR प्रक्रिये विरोधात कोर्टात आव्हान देण्यात येणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी दिली. पण त्यातच एका ग्रामीण भागात घरोघरी फॉर्म वाटप करण्यासाठी गेलेल्या एका महिला BLOवर एका घरमालकानं आपला पाळीव कुत्रा सोडला, या कुत्र्यानं संबंधित बीएलओला चावा घेतल्यानं तो गंभीर जखमी झाला आहे. पण नेमकं काय घडलं? जाणून घेऊयात.
केरळच्या कोट्टायम जिल्ह्यात स्पेशल इन्टेस्निव्ह रिव्हीजन (SIR) प्रक्रियेदरम्यान, एनेमरेशन फॉर्म वितरित करण्यासाठी गेलेल्या एका बुथ लेव्हल महिला अधिकाऱ्यावर (BLO) संबंधित घऱमालकानं आपला पाळलेला कुत्रा सोडला. या कुत्र्यानं थेट या महिलेच्या चेहऱ्यावर आणि मानेवर हल्ला केला. या हल्ल्यात ही महिला अधिकाऱी गंभीर जखमी झाली आहे. या अधिकाऱ्यानं आरोप केला की घरमालकानं मुद्दामहून आपल्यावर हल्ला करण्यासाठी कुत्रा सोडला. पुढे तीनं सांगितलं की, "जसं मी त्या घरी पोहोचले आणि त्यांना SIR साठी फॉर्म देत असल्याचं सांगितलं. तर त्या घर मालकानं आपल्या पाळलेल्या कुत्र्याची साखळी सोडली त्यानंतर त्या कुत्र्यानं थेट माझ्यावर हल्ला केला. या घटनेची माहिती स्थानिक प्रशासन आणि पोलिसांना देण्यात आली आहे, तसंच याची चौकशी सुरु करण्यात आली आहे"
केरळमध्ये मंगळवारपासून SIR अंतर्गत बीएलओच्या मार्फत घरोघरी जाऊन पुनर्पडतळणीचे फॉर्म वाटप सुरु केले आहे. पण नुकत्याच समोर आलेल्या या घटनेनं सुरक्षा आणि विरोधाबाबत आणखी प्रश्न उपस्थित केले आहेत. हा हल्ला अशा वेळी समोर आला, जेव्हा SIR बाबत राज्यात राजकीय आणि प्रशासकीय वाद उच्च पातळीवर पोहोचला आहे.
दरम्यान, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन यांनी घोषणा केली की, राज्य सरकार SIR प्रक्रियेला कोर्टात आव्हान देणार आहे. यासाठी बुधवारी एक ऑनलाईन सर्वपक्षीय बैठक घेण्यात आली. यामध्ये भाजपसोडून सर्वच पक्षांनी सरकारच्या भूमिकेला पाठिंबा दर्शवला. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, २००२ च्या मतदारयादीच्या आधारे SIR प्रक्रिया राबवणं हे चुकीचं आहे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका जवळ आल्या आहेत. त्यामुळं यावर कायदेशीर सल्ला घेऊन पुढे पावलं टाकली जातील. तसंच विरोधीपक्ष नेते व्ही. डी. सतीशन यांनी म्हटलं की, "आम्ही पूर्णपणे सरकारच्या चिंतेशी सहमत आहोत आणि जर हे प्रकरण कोर्टात गेलं तर विरोधकही यासाठी सरकारच्या पाठीशी असेल. एसआयआरची प्रक्रिया ही असंविधानिक आणि लोकशाहीविरोधी असल्याचं सीपीआय (मार्क्सवादी) राज्य सचिव एम. व्ही. गोविंदन यांनी म्हटलं आहे.
राज्यातील अनेक राजकीय पक्ष आणि संघटनांनी शंका उपस्थित केली की, २००२ च्या जुन्या मतदार यादीच्या आधारे नवी मतदार यादी तयार केल्यास अनेक गंभीर समस्या तयार होतील. सध्याच्या अपडेटेड मतदार यादी शिवाय SIR लागू करणं हे संशयास्पद आहे. या प्रक्रियेचा काहीतरी छुपा राजकीय हेतू असू शकतो. SIR मुळं बीएलओचे बुधवारपासून घरोघरी दौरे सुरु झाले आहेत.
सरकारनामाचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.