नवी दिल्ली : भारतात यंदा मान्सूनचा (Monsoon) पाऊस सर्वसाधारण प्रमाणात कोसळणार असल्याचा, असा प्राथमिक अंदाज 'स्कायमेट’(Skymet) या संस्थेने व्यक्त केला आहे. साधारणपणे जून ते सप्टेंबर या कालावधीत भारतात कोसळणाऱ्या मॉन्सूनच्या पावसावर बहुसंख्य शेतकरी (Farmers) अवलंबून असतात. (Skymet predicts good rains this year)
'मॉन्सूनचे आगमन' पावसाचे प्रमाण व त्याचे परतणे याच्या वेळापत्रकात अनेकदा बदल होत असतात. त्यामुळे इतक्या लवकरच त्याबाबत निश्चित अंदाज काढणे अशक्य आहे. तरीही, काही घटनांचा अभ्यास करून प्राथमिक अंदाज काढला असता यंदा मॉन्सून सर्वसाधारण प्रमाणात कोसळेल, असे 'स्कायमेट'ने म्हटले आहे. 'गेल्या सलग दोन मोसमांत प्रशांत महासागरातील 'ला निना'चा प्रभाव दिसून आल्याने यंदाही तो असण्याची शक्यता कमी झाली आहे. प्रशांत महासागरात विषुववृत्ताजवळ समुद्राच्या पृष्ठभागावरील तापमान लवकरच वाढण्यास सुरुवात होईल, असे 'स्कायमेट'च्या हवामान विभागाचे प्रमुख जी. पी. शर्मा यांनी सांगितले.
'ला निना' पॅटर्न हा प्रशांत महासागरातील थंड हवामानाशी निगडित आहे. 'ला निना'च्या कमी-अधिक प्रभावामुळेच पूर किंवा दुष्काळासारख्या घटना घडत असतात. गेली दोन वर्षे हा प्रभाव दिसून आला. यंदा मात्र, त्याचा प्रभाव घटताना दिसत असून तो परत वाढण्याची चिन्हे नाहीत. त्यामुळे यंदा देशात सर्वसाधारण मॉन्सून कोसळेल, असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.