New Parliament Inauguration
New Parliament Inauguration Sarkarnama
देश

New Parliament News: संसद भवन उद्घाटनाच्या वादावरून निघाली छत्तीसगड विधानसभेच्या भूमिपूजनाची आठवण; नेमकं काय घडलं होतं!

सरकारनामा ब्यूरो

New Parliament Inauguration News : देशाच्या नव्या संसद भवनाचे उद्घाटन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या 28 मे 2023 ला होणार आहे. मात्र, या ऐतिहासिक कार्यक्रमावर बहिष्कार घालण्याची घोषणा काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी केली आहे. संसदेच्या नव्या इमारतीचे उद्घाटन हे राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते व्हावे, अशी काँग्रेसची मागणी आहे.

यावर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी ट्विट करत "हा देशातील सर्वोच्च घटनात्मकपदाचा अपमान आहे", असं म्हटलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे पंतप्रधानपदावर म्हणजे घटनात्मकपदावर असूनही त्यांच्या हस्ते संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनाला काँग्रेससह काही विरोधी पक्षांनी विरोध दर्शवला आहे.

नव्या संसद भवनाच्या उद्घाटनाची चर्चा होत असतानाच छत्तीसगडच्या नव्या विधानसभा इमारतीच्या भूमिपूजनाचा एक मुद्दा चर्चेत आला आहे. छत्तीसगडच्या नव्या विधानसभेच्या इमारतीचे भूमिपूजन खासदार सोनिया गांधी आणि तत्कालीन खासदार राहुल गांधी यांनी 29 ऑगस्ट 2020 रोजी केले होते. या समारंभाला सोनिया गांधी आणि राहुल गांधी हे ऑनलाईन उपस्थित होते. तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्या हस्ते हे भूमिपूजन झाल्याचा उल्लेखही कोनशिलेवर आढळून येत आहे.

मग सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्याकडे खासदारपद यापेक्षा कोणत्याही दुसऱ्या घटनात्मकपदावर नसताना देखील छत्तीसगड विधानसभेचे भूमिपूजन त्यांनी केले होते. छत्तीसगडमध्ये भाजप विरोधी पक्षात आहे.

मात्र, तरी देखील भाजपने त्यावेळी विरोध केला नव्हता. मात्र, आता पंतप्रधान नरेंद्र मोदी हे तर पंतप्रधानपदावर म्हणजे घटनात्मकपदावर असतानाही काँग्रेस का विरोध करत आहे?, असा सवाल राजकीय वर्तुळात उपस्थित करण्यात येत आहे.

Edited by : Ganesh Thombare

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT