Vinesh Phogat Mansukh Mandaviya.jpg sarkarnama
देश

Video Vinesh Phogat Disqualified : विनेश फोगटवर सरकारने किती खर्च केला? क्रीडामंत्र्यांनी आकडेवारीच मांडली

Roshan More

Vinesh Phogat Disqualified : पॅरिस ऑलिम्पिकमध्ये सुवर्ण पदकासाठी आज (बुधवारी) विनेश फोगट हीची लढत होणार होती. फ्रीस्टाईल कुस्तीमध्ये 50 किलो वजनी गटात खेळणाऱ्या विनेशला सुवर्ण पदक मिळेल, अशी आशा होती.मात्र, स्पर्धेपूर्वीच तिला अपात्र घोषित करण्यात आले.

विनेशला अपात्र घोषित का घोषित केले याची माहिती तसेच सरकारने विनेशवर किती खर्च केलायाची आकडेवारी क्रीडामंत्री मनसुख मांडविया यांनी मांडली.

मनसुख मांडविया म्हणाले, विनेशचे वजन 50 किलो 100 ग्रॅम आढळून आले आणि तिला अंतिम सामन्यातून अपात्र ठरवण्यात आले. या विषयी भारतीय ऑलिम्पिक संघटनेने आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडे तक्रार केली आहे. आम्ही आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक संघटनेकडेही निषेध नोंदवला आहे. कुस्ती महासंघाने देखील याचा निषेध नोंदवला असल्याचे मांडविया म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वत: भारतीय ऑलिम्पिक समितीच्या प्रमुख पीटी उषा यांच्याशी चर्चा केली आहे. पीटी उषा सध्या पॅरिसमध्ये आहेत. आम्हाला न्याय मिळेल अशी आशा आहे,असे क्रीडा मंत्री मांडविया यांनी सांगितले.

विनेशवर किती खर्च केला?

मनसुख मांडविया म्हणाले, सरकारने विनेश फोगटला मदत करण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला. विनेशसाठी प्रसिद्ध हंगेरियन प्रशिक्षक व्होलर अकोस आणि फिजिओ अश्विनी पाटील तैनात होते. तसेज अनेक तज्ज्ञांची मदत घेतली जात होती. सरकारने विनेशवर 70 लाख 45 हजार रुपये खर्च केल्याची माहिती क्रीडामंत्र्यांनी दिली. तसेच विनेशला प्रशिक्षणासाठी परदेशात पाठवण्यात आल्याचे देखील त्यांनी सांगितले.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT