Kangana Ranaut : विनेश फोगाटनं अंतिम फेरी गाठताच मोदींचा उल्लेख करत कंगनानं डिवचलं; म्हणाली...

Kangana Ranaut Vs Vinesh Phogat : विनेशनं मंगळवारी युस्नेलिस गुझमान लोपेझचा एकतर्फी लढतीत पराभव केला. त्यातच कंगनानं जुना मुद्दा उकरून काढत खोचक अशी पोस्ट लिहिली आहे.
Vinesh Phogat | Narendra Modi | Kangana Ranaut
Vinesh Phogat | Narendra Modi | Kangana RanautSarkarnama
Published on
Updated on

Paris Olympics 2024 : भारताच्या विनेश फोगटने ऑलिम्पिक स्पर्धेत अंतिम फेरीसाठी पात्र ठरणारी पहिली भारतीय महिला कुस्तीगीर होण्याचा मान मिळवला आहे. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेतील 50 किलो वजनी गटाच्या उपांत्य फेरीत विनेशने मंगळवारी क्यूबाच्या पॅन-अमेरिकन विजेत्या युस्नेलिस गुझमान लोपेझचा एकतर्फी लढतीत पराभव केला. विनेशच्या कामगिरीनं भारताचे स्पर्धेतील चौथे पदक निश्चित झाले.

भारतीय कुस्तीपटूंनी गेल्या वर्षी कुस्तीगिर महासंघाचे तत्कालीन अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्याविरोधात लैंगिक छळाचा आरोप करत रस्त्यावर उतरून आंदोलन केलं होतं. त्यामुळे सत्ताधारी आणि सत्तेतील नेत्यांनी कुस्तीपटूंवर टीका केली होती. या सगळ्याला सामोरं जात विनेशनं आपलं ध्येय गाठलं आहे. यातच आता भाजपच्या खासदार कंगना रनौत ( Kangana Ranaut ) यांनी विनेशला शुभेच्छा देत 'इन्स्टाग्राम'वर खोचक स्टोरी शेअर केली आहे.

Vinesh Phogat | Narendra Modi | Kangana Ranaut
Kangana Ranaut : ठाकरे CM असताना बुलडोझरने पाडलेला कंगनाचा ‘तो’ बंगला विक्रीला; किंमत पाहून बसेल धक्का... 

विशेननं आंदोलनात सहभागी होत मोदींविधोत घोषणाबाजी केली होती. तरीही, तिला देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी दिली. हेच आपल्या लोकशाहीचं आणि आपल्या महान नेत्याचं सौंदर्य आहे, अशी डिवचणारी पोस्ट कंगना रनौत यांनी शेअर केली आहे.

Vinesh Phogat | Narendra Modi | Kangana Ranaut
Kangana Ranaut On Rahul Gandhi: खासदार कंगनाची मोठी मागणी; म्हणाली, '...म्हणून राहुल गांधींची ड्रग्ज टेस्ट करा!'

कंगना यांच्या पोस्टमध्ये काय?

"भारताला पहिलं सुवर्णपदक मिळेल, यासाठी मी प्रार्थना करते. एकेकाळी विनेश फोगाटनं आंदोलनात सहभागी होत, 'मोदी तेरी कब्र खुदेगी' अशी घोषणाबाजी केली होती. तरीही, तिला देशाचं प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आहे. तिला ट्रेनिंग, प्रशिक्षण आणि सगळ्या सुविधा देण्यात आल्या. हेच आपल्या लोकशाहीचं आणि महान नेत्याचं सौंदर्य आहे," असं कंगना रनौत यांनी म्हटलं आहे.

 kangana rauant instagram post
kangana rauant instagram postsarkarnama

आंदोलन कशासाठी?

विनेश फोगाट, साक्षी मलिक आणि बजरंग पुनिया यांनी दिल्लीत आंदोलन केलं होतं. तिघांनी तत्कालीनं कुस्तीगिर महासंघाचे अध्यक्ष ब्रिजभूषण सिंह यांच्यावर गंभीर स्वरूपाचे आरोप केले होते. यात पायाभूत सुविधांची कमतरता, आर्थिक गफलती, खेळाडूंशी गैरवर्तन हे आरोप होते. सगळ्यात गंभीर आरोप होता, तो म्हणजे लैंगिक शोषणाचा.

विनेश फोगाटनं म्हटलं होतं, "राष्ट्रीय शिबिरात ब्रिजभूषण सिंह कोच महिला कुस्तीपटूंचं लैंगिक शोषण करतात. आमच्या वैयक्तिक आयुष्यात ढवळाढवळ करतात. आम्हाला त्रास देतात."

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com