New Delhi : श्रीलंकेतील संसदेच्या निवडणुकीत राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्या पक्षाने ऐतिहासिक विजय मिळवला. दिसानायके यांनी डाव्या विचारसरणीच्या पक्षांना एकत्रित करत ही निवडणूक लढवली होती. त्यामुळे आता श्रीलंकेत डाव्यांचे सरकार आले असून दिसानायके या सरकारचे नेतृत्व करणार आहे. मात्र, भारतासाठी हे सरकार डोकेदुखी ठरू शकते, अशी चर्चा आहे.
दिसानायके यांच्या नॅशनल पीपुल्स पॉवर म्हणजेच एनपीपीला 225 पैकी 141 जागांवर विजय मिळाला आहे. त्यामुळे दिसानायके यांची खुर्ची वाचली आहे. या विजयामुळे श्रीलंकेत डाव्यांची पाळेमुळे खोलवर रुजल्याचे स्पष्ट झाले आहे. दिसानायके यांनी मागील वर्षीच सप्टेंबर महिन्यात राष्ट्रपती पदाची शपथ घेतली आहे. मात्र त्यांच्या पक्षाकडे संसदेत बहुमत नसल्याने त्यांनी संसद भंग केली होती.
नोव्हेंबर महिन्यांत मध्यावधी निवडणुकीचे आदेश देण्यात आले होते. त्यानुसार झालेल्या निवडणुकीत एनपीपीला बहुमत मिळाले आहे. सत्तेसाठी 225 पैकी 113 जागांवर विजय मिळणे आवश्यक असते. मात्र, 196 जागांवरह मतदारांना थेट मतदान करता येते. उर्वरित 29 जागांवर मतदानाच्या टक्केवारीच्या आधारे जय-पराजयाचा निकाल लागतो.
एकेडी म्हणून प्रसिध्द असलेले राष्ट्रपती दिसानायके हे डाव्या विचारसरणीचे नेते आहे. माक्सर्वादी विचारांनी प्रेरित असलेले एकेडी जनता विमुक्ती पेरामुना पक्षाचे प्रमुख आहे. हा पक्ष श्रीलंकेत भारतविरोधी भूमिकेसाठी ओळखला जातो. एकेडी यांना चीनचे समर्थक मानले जाते. एकेडी यांचा विजय चीनसाठी फायदेशीर ठरू शकतो. त्यामुळे भारताची चिंता वाढली आहे.
श्रीलंकेत आपली उपस्थिती वाढवण्यासाठी चीनकडून सातत्याने प्रयत्न केले जात आहेत. येथील हंबनटोटा हे बंदर आधीच चीनला 99 वर्षांच्या लीजवर देण्यात आले आहे. दिसानायके यांना 1987 मध्ये भारतीय शांती सेनेविरोधात विद्रोह केल्यामुळे प्रसिध्दी मिळाली होती. त्यावेळी भारतीय लष्कर लिट्टेच्या विरोधात श्रीलंकेत होते. त्यावेळी दिसानायके यांनी सातत्याने भारत आणि श्रीलंकेमधील कराराला विरोध केला होता. त्यामुळे आता सत्ता मिळाल्यानंतर ते भारताविषयी कोणती भूमिका घेणार, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.