Uddhav Thackeray, BJP
Uddhav Thackeray, BJPSarkarnama

Uddhav Thackeray VIDEO : मोठी बातमी : उद्धव ठाकरेंकडून जाहीर सभेत भाजपला साद; शिंदेंचा उमेदवार पाडण्यासाठी...

Sillod Assembly Constituency Election Shiv Sena UBT BJP Abdul Sattar : उद्धव ठाकरे यांची शुक्रवारी सिल्लोड येथे सभा झाली. यावेळी त्यांनी विद्यमान आमदार अब्दुल सत्तार यांच्यावर जोरदार टीका केली.
Published on

Sillod News : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी थेट भाजपला साद घातली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे सिल्लोड विधानसभा मतदारसंघातील उमेदवार अब्दुल सत्तार यांना पराभूत करण्याचे आवाहन ठाकरेंनी भाजप कार्यकर्त्यांना केले आहे.

सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंनी भाजपबाबत घेतलेल्या नरमाईच्या भूमिकेमुळे चर्चांना उधाण आले आहे. ठाकरेंनी शुक्रवारी सिल्लोड येथे झालेल्या जाहीर सभेत सत्तारांवर हल्लाबोल चढवताना भाजप कार्यकर्त्यांना आवाहन केले. भाजपच्या कार्यकर्त्यांनी मी आवाहन करतोय, विनंती करतोय. ठीक आहे, तुमचे आमचे मतभेद असतील. त्यासाठी माझ्याशी बोलायला कुणी तयार असेल तर मीही बोलायला तयार आहे, असे ठाकरेंनी म्हटले आहे.

Uddhav Thackeray, BJP
Ajit Pawar : उद्योगपतींचे ऐकून कोण मुख्यमंत्री बनले? अजित पवारांनी विरोधकांना घेरलं

आता आपण सगळे मिळून सिल्लोडला लागलेला कलंक दूर करुयात, असे आवाहनही ठाकरेंनी केले आहे. भाजपच्या लोकांना मनापासून, तळमळीने सांगतोय, ही संधी सोडू नका. पुन्हा आपल्या या सिल्लोडमध्ये गुंडागर्दी, दहशतीचे राज्य नको असेल तर सच्चा भाजपचा कार्यकर्ता आहे तो नक्कीच ही गुंडागर्दी मोडू टाकल्याशिवाय राहणार नाही, हे मला माहिती नाही. सगळ्यांनी एकत्रित येऊन आधी ही गुंडागर्दी मोडू काढूयात, असे आवाहन ठाकरेंनी केले.

सत्तार यांच्यावर टीका करताना ठाकरे म्हणाले, सुप्रिया सुळेंना शिवीगाळ करणारा उमेदवार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या व्यासपीठावर होता. त्यांनी जमीन बळकावली, भूखंड बळकावली. सत्ता आल्यानंतर याबाबत चौकशी करून तुरुंगात टाकू, असे ठाकरेंनी ठणकावून सांगितले. सत्तार यांना मागील निवडणुकीत तिकीट देणे ही आपली चूक होती, असेही ठाकरे म्हणाले.

Uddhav Thackeray, BJP
Devendra Fadnavis : ‘बटेंगे तो कटेंगे’वरून फडणवीस अन् अजितदादा आमनेसामने; काय म्हणाले?

गेल्यावेळी माझी चूक झाली. ही चूक मी मान्य करतो. पण या लोकांनी गोरगरीबांनी झोप उडवली. सोयाबीनला भाव नाही. पण गद्दारीला हमीभाव आहे. गद्दारांना पाडा, असे आवाहन ठाकरेंनी प्रचारसभेत केले. दरम्यान, ठाकरेंनी भाजपला केलेल्या या आवाहनानंतर सिल्लोडमध्ये भाजप कार्यकर्ते महायुतीचा धर्म पाळणार की, ठाकरेंच्या आवाहनाला सकारात्मक प्रतिसाद देणार, याचे उत्तर 23 नोव्हेंबरला समजेल.  

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com