Richest candidate in Second phase of Lok Sabha elections : देशात लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. मतदानाचा पहिला टप्पा पार पडला असून, आता दुसऱ्या टप्प्यातील मतदानाचा दिवसही जवळ येत आहे. याच दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामधील सर्वात श्रीमंत उमेदवारांची यादीसुद्धा जाहीर झाली आहे. असोसिएशन फॉर डेमोक्रेटिक रिफॉर्म्स(ADR)च्या रिपोर्टनुसार, दुसऱ्या टप्प्यातील उमेदवारांपैकी सर्वाधिक श्रीमंत उमेदवार स्टार चंद्रू हे आहेत. ज्यांची एकूण नेटवर्थ तब्बल 600 कोटी रुपयांपेक्षाही अधिक आहे.
स्टार चंद्रू काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभा निवडणूक लढवत आहेत. त्यांचे पूर्ण नाव वेंकटरमण गौडा आङे. मात्र ते स्टार चंद्रू या नावानेच सर्वपरिचित आहेत. एडीआरच्या रिपोर्टनुसार लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यामधील सर्वात श्रीमंत उमेदवारांमध्ये स्टार चंद्रू हे अव्वलस्थानी आहेत. त्यांची एकूण नेटवर्थ निवडणूक आयोगाकडे सोपवलेल्या शपथपत्रानुसार 622.97 कोटींपेक्षाही जास्त आहे.
(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)
लोकसभा निवडणूक जुन्या मैसूरमधील मांड्या मतदारसंघामधून लढवत असलेल्या स्टार चंद्री यांनी निवडणूक आयोगाला सांगितले की, त्यांचे वार्षिक उत्पन्न 16.28 कोटी रुपये आहे. गडगंज संपत्ती असणाऱ्या स्टार चंद्रू यांनी कर्नाटकामधील सर्वाधिक श्रीमंत उमेदवार ठरलेल्या डी के सुरेशकुमार यांनाही श्रीमंतीच्या बाबतीत पिछाडीवर टाकलं आहे.
ADRनुसार स्टार चंद्रू अर्थात व्यंकटरमण गौडा यांनी 2,12,78,08,148 रुपयांच्या चल संपत्तीसह 4,10,19,20, 693 रुपयांची अचल संपत्ती घोषित केली आहे. अशाप्रकारे त्यांची एकूण संपत्ती 6,22,97,28,841रुपये आहे. विशेष बाब म्हणजे त्यांच्या नावावर कोणतीही शेतजमीन नाही.
निवडणूक आयोगास सादर करण्यात आलेल्या शपथपत्रानुसार, जाहीर केलेल्या संपत्तीमध्ये त्यांची पत्नी कुसुमा गौडा 329.32 कोटी रुपयांची चल आणि अचल संपत्ती आहे. यामध्ये चल संपत्ती एकूण 182.33 कोटी रुपये आहे. ज्यामध्ये 176.44 कोटी रुपये गौडा यांच्याद्वारे चालवली जात असलेली कंपनी स्टार इन्फ्राटेकमध्ये गुंतवलेली आहे. याशिवाय त्यांच्याकडे 4.2 किलो सोने आहे, ज्याची किंमत 2.29 कोटी रुपये आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
R
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.