Lok Sabha Election 2024 : पंतप्रधान मोदींना काँग्रेस विचारणार जाब; काय आहे कारण?

Narendra Modi And Mallikarjun Kharge : लोकसभा निवडणूक लागताच पंतप्रधान मोदींनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देशभर सभा घेत आहेत. त्या सभांतून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर सडकून टीका करतात. आता त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याला लक्ष्य केले आहे.
Narendra Modi, Mallikarjun Kharge
Narendra Modi, Mallikarjun KhargeSarkarnama

Congress Vs BJP : देशभर लोकसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. महायुती आणि इंडिया आघाडीचे नेत्यांनी प्रचाराची राळ उठवली आहे. दोन्ही गटांकडून एकमेकांवर आरोप-प्रत्यारोपांच्या फैरी झडताना दिसत आहेत.

यातच पंतप्रधान नरेंद्र मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर सडकून टीका केली आहे. तसेच काँग्रेस देशावर मुस्लिम लीगचे विचार लादण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोपही केला. या आरोपांनंतर काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे Mallikarjun Kharge यांनी पंतप्रधान मोदींच्या भेटीसाठी वेळ मागितली आहे.

लोकसभा निवडणूक लागताच पंतप्रधान मोदींनी Narendra Modi महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारासाठी देशभर सभा घेत आहेत. त्या सभांतून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर सडकून टीका करतात. आता त्यांनी काँग्रेसच्या जाहीरनाम्याला लक्ष्य केले आहे. पंतप्रधान मोदींनी काँग्रेसच्या जाहीरनाम्यावर टीका केल्यानंतर खर्गेंनी मोदी यांच्याकडे वेळ मागितल्याची माहिती आहे. या भेटीत खर्गे काँग्रेसचा जाहीरनामा पंतप्रधान मोदींना समजावून सांगणार आहेत. त्यामुळे आता पंतप्रधान कार्यालयाकडून खर्गेंना काय उत्तर मिळणार याकडे लक्ष आहे.

Narendra Modi, Mallikarjun Kharge
Vishal Patil News : सांगलीत तिरंगी लढत; काँग्रेसच्या विशाल पाटलांची बंडखोरी भाजपच्या पथ्यावर ?

काय म्हटले होते मोदी?

काँग्रेस जिथे असते तिथे विकास होऊ शकत नाही. काँग्रेसने कधीही वंचित, शोषित, तरुणांचा विचार केला नाही आणि गरिबांचाही विचार केला नाही. काँग्रेस हा केवळ घराणेशाही करणारा आणि भ्रष्टचारात बुडालेला पक्ष आहे. काँग्रेसचा जाहीरनामा हा मुस्लिम लीगचा विचार आहे. काँग्रेस जिथे असते तिथे विकास होऊ शकत नाही.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

काँग्रेसचा Congress हा जाहीरनामा खोटारडा आहे. काँग्रेसच्या या जाहीरनाम्याच्या प्रत्येक पानावर देशाचे तुकडे करण्याचा विचार दिसतो. मुस्लिम लीगची विचारसरणी काँग्रेसच्या जाहीरनाम्यात दिसून येते. काँग्रेसला मुस्लिम लीगचे विचार देशावर लादायचे आहेत. काँग्रेसकडे ना तत्त्वे उरली आहेत ना धोरणे, हे या जाहीरनाम्यातून स्पष्ट होते. मोदी यांच्या वक्तव्यानंतर काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी काँग्रेसचा जाहीरनामा पंतप्रधानांना समजून सांगण्यासाठी वेळ मागितल्याचे समजते आहे.

(Edited by Sunil Dhumal)

R

Narendra Modi, Mallikarjun Kharge
Ajit Pawar : सुजय विखेंचा अर्ज भरण्यासाठी अजितदादांची दांडी; तर भाजपचे शिंदेंच्या शिलेदारांकडे दुर्लक्ष

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Politics News on Sarkarnama
sarkarnama.esakal.com