Dk Shivakumar
Dk Shivakumar Sarkarnama
देश

Karnataka Election Result 2023: काँग्रेसची ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल; डी के शिवकुमार यांना अश्रू अनावर...

सरकारनामा ब्यूरो

Karnataka Election Result Live Updates: कर्नाटक विधानसभा निवडणुकांची मतमोजणी सुरु आहे. यामध्ये आतापर्यंत हाती आलेल्या कलांनुसार काँग्रेसने मोठी आघाडी घेतली आहे. त्यामुळे काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचा जोरदार जल्लोष सुरू आहे.

कर्नाटक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष डी.के. शिवकुमार हे तब्बल एक लाख मतांनी विजयी झाले आहेत. त्यामुळे त्यांच्या कार्यकर्त्यांनी देखील एकच जल्लोष केला आहे.

कर्नाटकमध्ये काँग्रेस जवळपास बहुमतापेक्षा जास्त जागांवर सध्या आघाडीवर आहे. या सर्व पार्श्वभूमीवर माध्यमांशी बोलताना डी.के. शिवकुमार यांना अश्रु अनावर झाल्याचे पाहायला मिळाले.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेसला मिळालेलं हे यश पाहून डी.के. शिवकुमार हे काहीसे भावूक झाले. त्यांना माध्यमांशी बोलताना अश्रु अनावर झाले होते. यावेळी प्रतिक्रिया देताना ते म्हणाले, "काँग्रेसला मिळालेलं हे यश काँग्रेसच्या कार्यकर्त्यांचं आहे", अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

कर्नाटक विधानसभा निवडणुकीत काँग्रेस ऐतिहासिक विजयाकडे वाटचाल करत आहे. विधानसभा निवडणुकीचं चित्र जवळपास स्पष्ट होत आलं आहे. कर्नाटकात काँग्रेसला जवळपास 131 जागा मिळताना दिसत आहेत. तर भाजपला फक्त 67 जागा मिळताना दिसत आहे.

(Edited By : Ganesh Thombare)

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT