बेळगाव : राष्ट्रवादी काँग्रेसला विजयाची हमी वाटणाऱ्या निपाणीत काँग्रेसमुळे उत्तमराव पाटील हे अडचणीत येण्याची शक्यता आहे. निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेस आणि भाजपमध्ये काँटे की टक्कर सुरू आहे. या दोन्ही उमेदवारांमध्ये मताचे अंतर अत्यंत कमी आहे. त्यामुळे अटीतटीच्या लढतीत काँग्रेस राष्ट्रवादीचा उमेदवारांचा घात करण्याची नाकारता येत नाही. (Congress votes will be a hindrance to the victory of NCP candidate in Nipani)
निपाणीत राष्ट्रवादी काँग्रेसकडून (NCP) उत्तमराव पाटील, भाजपकडून (BJP) शशिकला जोल्ले, तर काँग्रेसकडून (Congress) काकासाहेब पाटील हे निवडणुकीच्या रिंगणात आहेत. उत्तमराव पाटील यांना सोळाव्या फेरीअखेर ५०२९७ मते पडली आहेत, तर भाजपच्या जोल्ले यांना ५५४३० मते पडलेले आहेत. तर काँग्रेसचे उमेदवार काकासाहेब पाटील यांनी ३२६०० मते पडली आहेत.
राष्ट्रवादीचे पाटील आणि भाजपच्या जोल्ले यांच्यामध्ये काँटे की लढाई सुरू आहे. काही फेऱ्यात पाटील हे आघाडीवर हेाते, तर काही फेऱ्यात भाजपच्या जोल्ले हे आघाडीवर गेल्या आहेत. जोल्ले आणि पाटील यांच्यात ५१३३ मतांचे अंतर आहे. काँग्रेसचे काकासाहेब पाटील यांनी ३२६००मते घेतली आहेत, त्यामुळे काँग्रेस उमेदवार काकासाहेब पाटील यांच्यामुळे राष्ट्रवादीचे उत्तमराव पाटील अडचणीत येण्याची शक्यता वर्तविली जात आहे.
आतापर्यंत मतमोजणीच्या सतरा फेऱ्या पूर्ण झाल्या आहेत, आणखी सहा फेऱ्यांची मतमोजणी होणे बाकी आहे. त्यात भाजपच्या जोल्ले यांच्या मताधिक्क्यात वाढ होत आहे, त्यामुळे उत्तमराव पाटील यांचे स्पप्न भंग होण्याची शक्यता जास्त आहे. कारण मतांचे अंतर वाढत चाललेले आहे.
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.