PM Narendra Modi, Share Market Sarkarnama
देश

Stock Market after Exit Poll : डी-स्ट्रीटवर मोदी लाट; सेंसेक्सने गाठले नवे शिखर

Rajanand More

Share Market Update : लोकसभा निवडणुकीच्या निकालाआधी शेअर बाजारात मोठ्या घडामोडी घडत आहेत. एक्झिट पोलमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी सलग तिसऱ्यांदा शपथ घेतील, असा अंदाज वर्तवण्यात आला असून त्याचे पडसात शेअर बाजारतही उमटले आहेत. सोमवारी आठवड्याच्या पहिल्या दिवश सेंसेक्सने नवा उच्चांक गाठला.

मुंबई शेअर बाजारात (BSE) प्री-ओपन सेशनमध्येच 2621 अंकांची उसळी पाहायला मिळाली. सेन्सेक्सने 76,738.89 अंकांचा ऐतिहासिक स्तर गाठला. निफ्टीनेही एक हजार अंकांनी उसळी घेतली. त्यामुळे निफ्टीनेही 23,338.70 अंकांचे नवे शिखर गाठले.

मागीठ आठवड्यात शेअर बाजारात चढ-उतार पाहायला मिळाले होते. पण शनिवारी एक्झिट पोलचे अंदाज आल्यानंतर शेअर बाजाराकडे सर्वांचेच लक्ष लागले होते. बाजारात मोठी उलाढाल होईल, अशी अपेक्षा होती. त्यानुसार प्री-ओपन सेशनमध्येच बाजाराने तेजीचे संकेत दिले.

अदानींचे शेअर तेजीत

शेअर बाजारात सुरू होताच मुंबई शेअर बाजरात जवळपास 30 शेअरमध्ये मोठी तेजी पाहायला मिळाली. प्रामुख्याने उद्योगपती गौतम अदानी यांच्या अदानी ग्रुपमधील शेअर बाजारात लिस्टेट कंपन्यांच्या शेअरमध्येही जोरदार तेजी आली. अदानी एंटरप्रायझेस, अदानी पोर्ट, अदानी टोटल गॅस, अदानी एनर्जी सोल्युशन्स, अदानी पॉवरचे शेअर तब्बल 7 ते 15 टक्क्यांनी वाढले. 

दलाल स्ट्रीटवर एक्झिट पोलची कमाल

एक्झिट पोलच्या आकड्यांमुळे मुंबईतील दलाल स्ट्रीटवर मोठी उलाढाल होता आहे. जून महिन्याच्या पहिल्या दिवशी शेअर बाजाराने उच्चांक गाठत गुंतवणूकदारांना मोठा फायदा करून दिला. सर्व एक्झिट पोलने भाजपचा विजय होणार असल्याचे संकेत दिल्यानेच ही तेजी पाहायला मिळत असल्याचे तज्ज्ञांकडून सांगितले जात आहे.

निकालाकडे लक्ष

एक्झिट पोलने मोदी लाटेचे संकेत दिले असले तरी प्रत्यक्ष निकाल काय लागतात, याकडेही संपूर्ण जगाचे लक्ष लागले आहे. एक्झिट पोलनुसारच निकाल आल्यास शेअर बाजारात तेजी कायम राहणार असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, निकाल वेगळे आल्यास बाजारातील तेजी कमी होण्याची शक्यता आहे.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT