Strong Earthquake Tremors Felt In Delhi  Sarkarnama
देश

Delhi NCR Earthquake : राजधानी दिल्ली भूकंपानं हादरली

Strong Earthquake Tremors Felt In Delhi:रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4 इतकी नोंदवण्यात आली आहे.

Mangesh Mahale

Delhi News: राजधानी दिल्ली आणि एनसीआर परिसराला आज पहाटे भूकंपाचा जोरदार धक्का बसला. पहाटे 5 वाजून 36 मिनिटांनी हा भूकंप झाला.भूकंपाचे केंद्रबिंदू दिल्लीजवळच होता. रिक्टर स्केलवर या भूकंपाची तीव्रता 4 इतकी नोंदवण्यात आली आहे.

भूकंप झाला तेव्हाचे अनेक सीसीटीव्ही फुटेज सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. दिल्लीकरांना सोमवारी पहाटे ५ वाजून ३६ मिनिटांनी भूकंपाच्या धक्काने जाग आली. नागरिक घराच्या बाहेर पळाले. नोए़डा पासून दिल्लीच्या काही परिसरात काही मिनिटं भीतीचं वातावरण होते. दिल्लीतील अनेक भागांमध्ये लोक घाबरुन घराबाहेर, इमारतींखाली रस्त्यावर उभे असल्याचं चित्र पहाटेच्या सुमारास पाहायला मिळालं.

प्राथमिक माहितीनुसार दिल्लीतील नांगलोई जाट भूकंपाचं केंद्र असून, आगरा, मथुरा, हरियाणपर्यंत जाणवले भूकंपाचे धक्के जाणवले असल्याची स्थानिक नागरिकांनी सांगितले.

पंतप्रधान मोदी यांनीही भूकंपाच्या नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले आहे. दिल्ली आणि आजूबाजूच्या परिसरात भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. प्रशासन या परिस्थितीवर लक्ष ठेऊन आहेत. नागरिकांनी घाबरून जाऊ नये, असे त्यांनी सोशल मिडिया 'x'वर म्हटलं आहे.

सरकारनामाचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT