Subramanian Swamy Vs Rahul Gandhi Sarkarnama
देश

BJP Vs Rahul Gandhi : राहुल गांधींच्या भारतीय नागरिकत्वावर पुन्हा प्रश्नचिन्ह; भाजप नेत्याचा गंभीर आरोप; मोदी- शहांनाही ओढले वादात

Pradeep Pendhare

Mumbai : भारत जोडो यात्रा, न्याय यात्रानंतर लोकसभेत मिळवलेल्या यशानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी लोकसभेत विरोधी पक्षनेते म्हणून सत्ताधारी भाजपवर भारी पडू लागलेत. राहुल गांधी यांना रोखण्यासाठी वेगवेगळ्या मार्गाने सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न सुरू करत आहेत.

यातच भाजपचे जने नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी पुन्हा एकदा राहुल गांधी यांच्या नागरिकत्वाचा मुद्दा चर्चेत आणला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे राहुल गांधी यांच्यावर कारवाई करत नसल्यामागे सोनिया गांधी त्यांना ब्लॅकमेल करत असल्याचा आरोप सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

भाजपचे (BJP) जुने सुब्रमण्यम स्वामी यांनी यावेळी राहुल गांधी यांनाच नाही, तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांना देखील नागरिकत्वाच्या वादात ओढले आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी समाज माध्यम 'एक्स'वर पोस्ट शेअर केली आहे. पंतप्रधान मोदी आणि शाह दोघेजण राहुल गांधी यांना वाचवत असलतील, तर मला केस दाखल करावी लागले, असे त्यांनी पोस्टमध्ये म्हणत खळबळ उडवून दिली आहे.

सुब्रमण्यम स्वामी यांनी पोस्टमध्ये मोदी आणि शाह हे राहुल गांधी (Rahul Gandhi) यांना का वाचवत आहे? ते विदेशी नागरिक आहेत, 2023 मध्ये त्यांनी ब्रिटीश नागरिकत्व घेतलेले आहे. याशिवाय त्यांनी लंडनमध्ये बँक ऑप्स नावाची कंपनी देखील सुरू केली आहे. यामुळे त्यांना भारतीय नागरिकता अमान्य झाली आहे. पंतप्रधान मोदी जर राहुल गांधी यांना वाचवत असतील, तर मला न्यायालयात केस दाखल करावी लागले, असे म्हटले आहे.

यासंदर्भात सुब्रमण्यम स्वामी यांनी गृहमंत्रालयाचे एक पत्र देखील जोडले आहे. सुब्रमण्यम स्वामी यांनी 2019 मध्ये हेच आरोप राहुल गांधी यांच्यावर लगावले होते. गृहखात्याने नोटीस पाठवत खुलासा करण्याचे आवाहन केले होते. तीच नोटीस पुन्हा पोस्टवर शेअर करत राहुल गांधी यांच्या नागरिकतेवर स्वामींनी निशाणा साधला आहे. यासोबत सुब्रमण्यम स्वामी यांनी लंडन येथे आयटी रिर्टन फाईल देखील जोडली आहे. राहुल गांधी यांनी भरलेल्या आयटी रिर्टनची काॅपी जोडून ते ब्रिटीश नागरिक असल्याचे म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सोनिया गांधी ब्लॅकमेल करत आहे का, असा सवाल देखील सुब्रमण्यम स्वामी यांनी केला.

राहुल गांधी यांनी आयटी रिर्टन भरलेल्या काॅपीवरचा पत्ताकडे सुब्रमण्यम स्वामी यांनी लक्ष वेधले आहे. राहुल गांधी यांचा लंडनमधील 51, साउथगेट स्ट्रीट, विंचेस्टर, हैंपशायर असा कागदोपत्री पत्ता दाखवण्यात आला आहे. तसंच 19 जून 1970 अशी जन्मतारीख दाखवण्यात आली आहे. सुब्रमण्यम स्वामी 2017 मध्ये देखील राहुल गांधी यांच्या नागरिकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT