PM Narendra Modi : पंतप्रधान नरेंद्र मोदींना जीवे मारण्याची धमकी दिल्या गेल्याचं समोर आलं आहे. धमकीची एक पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर खळबळ उडाली. यानंतर गुप्तचर यंत्रणा, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांनी तत्काळ तपासाची सूत्रे फिरवली दोन तरुणांनाही अटक केली आहे.
प्राप्त माहितीनुसार या दोन तरुणांनी सोशल मीडियाद्वारे (इन्स्टाग्राम) ही धमकी दिल्याचे समोर आले आहे. पंतप्रधानांना जीवे मारण्याची धमकी मिळाल्याचे समोर आल्याननंतर तातडीने इंटेलिजन्स ब्यूरोने कारवाई करत या दोन तरूणांना अटक केली.
आयबीने राजस्थानातील डीग जिल्ह्यातून या दोन तरूणांना अटक केली आहे. सध्या या दोन तरुणांची कसून चौकशी सुरू आहे. पोलिस हे जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहे की, या दोन तरुणांनी अशाप्रकारची पोस्ट सोशल मीडियावर का आणि कशाप्रकारे टाकली?, याशिवाय पोलिस याचाही शोध घेत आहे की, या दोन तरुणांच्या पाठिशी आणखी कोणती दहशतवादी संघटना कार्यरत आहे का? अद्याप तरी या प्रकरणात कोणत्याही दहशतवादी संघटनेचा सहभाग असल्याचे आढळलेले नाही. या तरुणांनी इन्स्टाग्राम अकाउंटवरून मोदींना जीवे मारण्याची धमकी दिली होती.
मीडिया रिपोर्ट्नुसार, पंतप्रधान मोदींना(Narendra Modi) धमकी देण्यात आल्याची माहिती मिळताच आयबीच्या टीमने तपसाची सूत्रे वेगाने चालवली आणि राजस्थानमधील डीग जिल्ह्यातून दोन तरुणांना अटकही केली. अटक करण्यात आलेल्यामधील एकाचे नाव राहुल मेव तर दुसऱ्याचे नाव शाकीर मेव आहे. या दोघांना अटक करून कसून चौकशी केली गेली असता हे दोघे सायबर गुन्ह्यातील आरोपी असल्याचेही समोर आले आहे.
याशिवाय या दोघांच्या चौकशीत हेही समोर आले की, या दोघांनी अन्य काही जणांशीही संपर्क केला होता. मात्र कोणत्या आरोपीने कोणच्या फोनवरून कोणाशी संपर्क साधला याबाबत अद्यापर्यंत माहिती समोर आलेली नाही. आयबी आणि राजस्थान(Rajasthan) पोलिस याप्रकरणाची सखोल तपास करत आहे. या दोघांच्या अधिक चौकशीतून माहिती समोर येईल, की त्यांनी नेमकं हे कृत्य का केलं आणि कुणाच्या सांगण्यावरून केलं?, यामामगे मोठं षडयंत्र घडवण्याची त्यांची योजना होती का हेही तपासलं जाणार आहे.
(Edited by - Mayur Ratnaparkhe)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.