Sukesh Chandrasekhar, Arvind Kejriwal Sarkarnama
देश

Arvind Kejriwal News : केजरीवालांच्या अडचणी पुन्हा वाढणार? ; सुकेश चंद्रशेखरच्या तक्रारीवरून 'CBI'ने...

Sukesh Chandrasekhar allegations against Arvind Kejriwal : ...'ही' तक्रार सुकेशने तुरुंगातूनच दिल्लीचे उपराज्यपाल आणि गृहमंत्रालयास पत्र पाठवून केली होती.

Mayur Ratnaparkhe

Sukesh Chandrasekhar Vs Arvind Kejriwal : दिल्लीचे माजी मुख्यमंत्री आणि आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक केजरीवाल यांच्यासमोर अडचणी अद्याप संपलेल्या नाहीत. खरंतर केजरीवाल नुकतेच तिहारमधून बाहेर आले आहेत. कथित दिल्ली मद्य धोरण घोटाळ्याशी संबंधित प्रकरणात त्यांना तुरुंगात जावं लागलं होतं. आता ते तुरुंगातून बाहेर पडले आहेत, तर महाठग सुकेश चंद्रशेखरने केजरीवालसह अन्य नेत्यांवर दहा कोटींच्या जबरदस्ती वसूलीचा आरोप केला आहे. आता याप्रकरणी सीबीआयने सुकेशचा जबाब तुरुंगातूनच नोंदवला आहे.

प्रत्यक्षात सुकेश चंद्रशेखरने तिहार तुरुंगातून अरविंद केजरीवाल(Arvind Kejriwal), सत्येंद्र जैन आणि तत्कालीन डीजी संदीप गोयल यांच्यामार्फत दहा कोटी रुपये 'एक्सटॉर्शन मनी' मागितल्या गेल्याचे आरोप केले होते. ही तक्रार सुकेशने तुरुंगातूनच दिल्लीचे उपराज्यपाल आणि गृहमंत्रालयास पत्र पाठवून केली होती. यानंतर सुकेशच्या तक्रारीबाबत चौकशी करण्यास उपराज्यपाल आणि गृहमंत्रालयाकडून परवानगी दिली गेली होती.

अरविंद केजरीवाल, सत्येंद्र जैन आणि माजी तिहारचे माजी DG संदीप गोयल यांच्या विरोधात सुकेश चंद्रशेखरने केलेल्या तक्रारीप्रकरणी सीबीआयने कारवाई सुरू केली आहे. सीबीआयने तुरुंगात जावून मंगळवारी महाठग सुकेश चंद्रशेखरचा(Sukesh Chandrasekhar) जबाब नोंदवला आहे.

सीबीआया(CBI)ने न्यायालयाकडे सुकेशचा जबाब नोंदवण्यासाठी परवानगी मागितली होती. सीबीआयच्या या मागणीवर तीसहजारी कोर्टाने परवानगी दिली होती. तर प्राप्त माहितीनुसार सीबीआय लवकरच पुन्हा एकदा तुरुंगात जाऊन सुकेशचा जबाब नोंदवू शकते.

(Edited by - Mayur Ratnaparkhe)

सरकारनामाचे सदस्य व्हा

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT