Sukesh Chandrashekhar says he ordered furniture for Arvind Kejriwal cm house : दिल्लीच्या मंडोली कारागृहात बंद असलेला महाठग सुकेश चंद्रशेखर (Sukesh Chandrashekhar) पुन्हा एकदा चर्चेत आला आहे.
पण यावेळी तो कोणत्याही आरोपांमुळे किंवा त्यांची मैत्रीण अभिनेत्री जॅकलिन सोबतच्या त्याच्या नात्यामुळेही सध्या तो चर्चेत नाही. तर सुकेशने दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्यांच्या नुतनीकरणाबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्याने याबाबत दिल्लीचे उपराज्यपाल व्हीके सक्सेना यांना पत्र लिहिले आहे. यात त्याने अनेक खुलासे केले आहेत.
दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणाचे प्रकरण चांगलेच तापले आहे. आठ लाखाचे पडदे, सव्वा कोटी रुपयांचे मार्बल अशा अनके महागड्या वस्तुंमुळे केजरीवाल यांचा सरकारी बंगला सध्या चर्चेत आहे.
या बंगल्याच्या नुतनीकरणावरुन विरोधकांनी केजरीवाल यांनी लक्ष्य केले आहे. या प्रकरणाला आता सुकेशमुळे वेगळ वळण लागण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्याने पुन्हा एकदा केजरीवाल यांच्यावर गंभीर आरोप लावले आहेत. दोनशे कोटी रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणी सुकेश सध्या कारागृहात आहे.
केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नुतनीकरणासाठी विविध वस्तू मीच खरेदी केल्या होत्या, असा दावा सुकेशने केला आहे. केजरीवाल यांच्या बंगल्यात जे फर्निचर आहे, त्यांची निवड आम आदमी पक्षाचे नेते सत्येंद्र जैन आणि केजरीवाल यांनी केली आहे. या बंगल्यासाठी खरेदी करण्यात येणाऱ्या वस्तूंचे फोटो केजरीवाल यांनी मला व्हाट्सअँपवर पाठवले होते. केजरीवाल यांनी ४५ लाख रुपयांचे डायनिंग टेबल खरेदी केले आहे, असे सुकेशने लिहिलेल्या पत्रात म्हटलं आहे.
"हे फर्निचर आपण थेट केजरीवाल यांच्या कार्यालयात पाठवले होते. येथे त्याचे कर्मचारी रिषभ शेट्टी यांच्या माध्यमातून हे फर्निचर त्यांच्या बंगल्यात पाठवण्यात आले. हे सारे फर्निचर इटली आणि फ्रान्स येथून मागविण्यात आले आहेत. त्याचे पुरावे आपण केंद्रीय तपास यंत्रणांना देणार आहे," असे सुकेश यांना उपराज्यपालांना पाठवलेल्या पत्रात म्हटलं आहे.
केजरीवाल यांच्या बंगल्याच्या नूतनीकरणावर सुमारे ४५ कोटी रुपये खर्च करण्यात आल्याती माहिती प्रसिद्ध झाली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दस्तऐवजांमध्ये असलेल्या माहितीनुसार, सिव्हिल, इलेक्ट्रिकल आणि प्लंबिंग कामांव्यतिरिक्त विविध वॅटेज आणि आकाराचे स्मार्ट लायटिंग फिक्स्चर (२,४४६ फिक्स्चर), ऊर्जा कार्यक्षम पंखे (८० पंखे) आणि डंबवेटर लिफ्ट (जेवण पोहोचवण्यासाठी) एकूण खर्चाचा भाग आहे.
केजरीवाल यांच्या बंगल्यातील एका पडद्याची किंमत ८ लाख रुपयांच्या घरात आहे. असे २३ पडदे मागवण्यात आले आहेत.
१ कोटी १५ लाख किमतीचे मार्बल व्हिएतनाममधून आयात करण्यात आले आहेत.
४ कोटी किमतीचे प्री-फॅब्रिकेटेड लाकूड बसवण्यात आले आहे.
घरातील कामासाठी पहिली मंजुरी १ सप्टेंबर २०२० रोजी मिळाली होती.
दुसरी मंजुरी मे २०२१ मध्ये मॉड्यूलर किचन, लॉन्ड्री आणि पॅन्ट्री इत्यादी बनवण्यासाठी देण्यात आली.
(Edited By : Mangesh Mahale)
सरकारनामाचे सदस्य व्हा
Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.