Sunita Kejriwal sarkarnama
देश

Sunita Kejriwal News : सुनीता केजरीवालांचा भाजप सरकारवर गंभीर आरोप; म्हणाल्या, "तुरुंगात मुख्यमंत्र्यांना..."

Akshay Sabale

दिल्लीत कथित मद्य घोटाळ्याप्रकरणी ( Delhi Liquor Case ) अंमलबजावणी संचालनालयानं ( ईडी ) एक महिन्यापूर्वी आम आदमी पक्षाचे सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल ( Arvindr Kejriwal ) यांना अटक केली होती. यातच अरविंद केजरीवाल यांच्या पत्नी सुनीता केजरीवाल ( Sunita Kejriwal ) यांनी केंद्रातील भाजप सरकारवर हल्लाबोल केला आहे. "अरविंद केजरीवालांना तुरुंगात संपवण्याचा कट रचला जात आहे," असा आरोप सुनीता केजरीवाल यांनी केला आहे.

झारखंडमधील रांची येथे 'इंडिया' आघाडीनं महारॅलीचं आयोजन केलं होतं. यावेळी सुनीता केजरीवालांनी केंद्रातील भाजप सरकारवर निशाणा साधला. "मुख्यमंत्री केजरीवालांना संपवण्याचा कट रचला जात आहे. त्यांना औषधं दिली जात नाही. माझ्या पतीची काय चुकी होती की त्यांना तुरूंगात पाठवण्यात आलं? तुरुंगाचे कुलूप तुटणार आणि केजरीवाल बाहेर येणार," असा विश्वास सुनीता केजरीवाल यांनी व्यक्त केला.

(राजकारणातील महत्त्वाच्या बातम्यांचे अपडेट्ससाठी सरकारनामाचे अधिकृत WhatsApp चॅनल फॉलो करा!)

आपचे खासदार संजय सिंह ( Sanjay Singh ) यांनीही भाजपचा समाचार घेतला. संजय सिंह म्हणाले, "तेजस्वी यादव ज्यापद्धतीनं भाजपविरोधात लढाई लढत आहेत, त्याबद्दल त्यांचं अभिनंदन करतो. झारखंडमध्ये आपण हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांच्यासाठी एकत्र आले आहोत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संदेश देऊ इच्छितो की, पूर्ण आदिवासी समाज त्यांच्याविरोधात आहे."

"भाजप डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संविधानाला नाहीतर, तर नागपूरच्या संविधानाला मानते. हुकूमशाहीच्या विरोधात लढण्यासाठी पूर्ण देश 'इंडिया' आघाडीबरोबर आहे. देश आणि संविधान वाचविण्यासाठी आम्ही लढाई लढत आहोत," असा एल्गार संजय सिंह यांनी केला.

दरम्यान, आपचे प्रवक्ते सौरभ भारद्वाज यांनी केजरीवालांना उपचार घेऊ दिले जात नसल्याचा आरोप तुरुंग प्रशासनावर शनिवारी ( 20 एप्रिल ) केला होता. "तुरुंगात बंद असलेले केजरीवाल टाईप 2 मधुमेहाचे रुग्ण आहेत. तुरुंग प्रशासन केजरीवालांना डॉक्टरांचे उपचार घेण्याची मागणी मान्य करीत नसून, यातून त्यांना संपण्याचा कट रचला जात आहे," असं सौरभ भारद्वाज यांनी म्हटलं होतं.

Read Latest Marathi Political News, Breaking Political News from Maharashtra, India, Pune & Mumbai at Sarkarnama. To Get Live Political Marathi News on Mobile, Download the Sarkarnama Mobile App for Android and IOS. सरकारनामा आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या राजकीय घडामोडींसाठी फेसबुकट्विटरइन्स्टाग्राम, शेअर चॅट, टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, सरकारनामा यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

SCROLL FOR NEXT